Optical Illusion IQ Test | फक्त 5% लोकांना या चित्रात बेडूक दिसलाय, तुम्हाला दिसतोय?
आता यात तुम्हाला बेडूक शोधायचा आहे. तुम्हाला या चित्रातील छत्र्यांवर सुद्धा काही प्रिंट्स दिसतील. हे प्राण्यांचे, पक्ष्यांचे प्रिंट्स आहेत. काही वेळ तुम्हाला असंही वाटू शकतं की बेडूक या छत्र्यांवरच आहे. इतका पाऊस आहे म्हणल्यावर बेडूक इथेच कुठेतरी असू शकतो.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण कोडी सोडवायचो. ही कोडी आपण तोंडी सोडवायचो. समोरचा आपल्याला तोंडी कोडी घालायचा आणि आपण सुद्धा त्याचं तोंडी उत्तर द्यायचो. ऑप्टिकल भ्रम खूप किचकट असतात. याचं उत्तर त्याच माणसाला येतं ज्याचं निरीक्षण कौशल्य चांगलं असतं. ज्या व्यक्तीचं निरीक्षण चांगलं त्याला लगेच उत्तर सापडणार. यात अनेक प्रकार असतात. कधी आपल्याला यात नंबर शोधायचे असतात, कधी अक्षर, कधी शब्द तर कधी दोन चित्रांमधील फरक शोधायचा असतो. ऑप्टिकल भ्रम बघताच क्षणी माणसाचा गोंधळ उडतो.
हे व्हायरल झालेलं चित्र बघा
या चित्राकडे बघून सुद्धा तुमचा गोंधळ उडेल. कारण या चित्रात तुम्हाला बेडूक शोधायचा आहे. चित्र पहा, यात खूप पाऊस पडतोय, खूप लोकं आहेत आणि सगळे छत्री घेऊन रस्त्याने चाललेत. हे कुठलं तरी गार्डन असावं. आता यात तुम्हाला बेडूक शोधायचा आहे. तुम्हाला या चित्रातील छत्र्यांवर सुद्धा काही प्रिंट्स दिसतील. हे प्राण्यांचे, पक्ष्यांचे प्रिंट्स आहेत. काही वेळ तुम्हाला असंही वाटू शकतं की बेडूक या छत्र्यांवरच आहे. इतका पाऊस आहे म्हणल्यावर बेडूक इथेच कुठेतरी असू शकतो.
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का?
या चित्रात नीट बघा, आम्ही सांगतो उत्तर कसं शोधायचं? जेव्हा ऑप्टिकल इल्युजनचा प्रश्न विचारला जातो तेव्हा तो काय प्रश्न आहे हे लक्षात ठेवा. यात तुम्हाला बेडूक शोधायला लावला आहे हे डोक्यात ठेवा. डावीकडून उजवीकडे नीट बघत जा, वरून-खाली बघा. आता तुम्हाला बेडूक दिसतोय का? बेडकाचा रंग, त्याचं वेगळेपण तुम्हाला माहित असेल तर शोधताना सुद्धा तुम्ही त्याच गोष्टींचा शोध घ्याल. आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? बेडूक सापडला असेल तर अभिनंदन! नसेल सापडला तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.