Optical Illusion | हे चित्र बघा, यात तुम्हाला आधी काय दिसतंय? वाचा तुमची पर्सनॅलिटी कशी आहे…
आपल्याला प्रथमदर्शनी जे दिसतं तेच सत्य असतं असं नसतं. हेच खरं कोडं असतं! वेगवेगळ्या प्रकारच्या इमेज यात असतात. कधी यात तुम्हाला सर्वात आधी काय दिसतंय हे शोधावं लागतं तर कधी यात चूक शोधून दाखवावी लागते. यात तुमच्या मेंदूची परीक्षा घेतली जाते. लोकं सुद्धा या ऑप्टिकल इल्युजनचे फॅन्स आहेत.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. आपण लहानपणी तोंडी कोडी सोडवायचो आता तीच कोडी ऑनलाइन आलेली आहेत. इल्युजन म्हणजे एकप्रकारची फसवी इमेज असते. यात आपल्याला प्रथमदर्शनी जे दिसतं तेच सत्य असतं असं नसतं. हेच खरं कोडं असतं! वेगवेगळ्या प्रकारच्या इमेज यात असतात. कधी यात तुम्हाला सर्वात आधी काय दिसतंय हे शोधावं लागतं तर कधी यात चूक शोधून दाखवावी लागते. यात तुमच्या मेंदूची परीक्षा घेतली जाते. लोकं सुद्धा या ऑप्टिकल इल्युजनचे फॅन्स आहेत. ही चित्रे इंटरनेटवर खूप प्रसिद्ध आहेत.
आता हा फोटो बघा. ऑप्टिकल इल्युजनचे काही फोटो, चित्र असेही असतात ज्यात तुमचं व्यक्तिमत्त्व खूप व्यवस्थितपणे समजून येतं. ही एक पर्सनॅलिटी टेस्ट असते. वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये आजकाल अशा प्रकारची टेस्ट घेतली जाते. ही टेस्ट घेताना विशेषतः या अशा चित्रांचा, पेंटिंग्सचा वापर केला जातो. यात आपल्याला आधी काय दिसतं त्यानुसार आपली पर्सनॅलिटी आहे असं सांगितलं जातं. या फोटोत बघा असंख्य गोष्टी आहेत. पण यात आधी तुम्हाला काय दिसतंय? आधी चित्र बघा…
यात सिंह, माकड, हत्ती, मांजर, लांडगा आहे. व्हेल मासा आहे, घुबड आहे आणि घोडा आहे. आता तुम्हाला काय आधी दिसलं त्यासमोर काय लिहिलंय ते पहा.
सिंह: हिरव्या रंगात रेखाटलेला सिंह दिसला तर तुम्ही आत्मविश्वासी आहात. एक उत्तम लीडर आहात.
मांजर: जर आपण मांजर पाहिली असेल तर आपण दृढ निश्चयी आणि प्रेरित आहात.आपल्याला आपली जागा आणि एकांत इतर लोकांपेक्षा जास्त आवडते.
लांडगा: जर डाव्या कोपऱ्यातील लांडग्याने तुमचे लक्ष वेधून घेतले, तर आपल्याकडे एक गूढ व्यक्तिमत्व आहे. आव्हाने खूप चांगली हाताळता.
व्हेल: जर आपण व्हेल प्रथम पाहिले तर तुम्हाला तुमची किंमत चांगलीच माहित आहे. तुम्ही स्वतःसाठी स्टॅन्ड घेता आणि तेही विनासंकोच.
घोडा: जे लोक प्रथम भ्रमात उडी मारणारा घोडा पाहतात त्यांच्यात उत्साही आणि साहसी वृत्ती असते. ते असे लोक आहेत ज्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या स्वातंत्र्यावर जास्त प्रेम आहे.
घुबड: ज्या लोकांना घुबड प्रथम दिसून येते ते सहसा बुद्धिमान आणि बरेचदा इतरांच्या गरजेबद्दल संवेदनशील असतात.
कोल्हा: कोल्हा दिसला असेल तर आपण राखीव, पॅशनेट आणि एक धाडसी व्यक्ती आहात.
माकड: आपण मौजमजा करणारे आणि हसण्याचा आनंद घेणारे आहात. कधीकधी लोक आपल्या या हॅपी गो लकी बाजूस गृहीत धरतात ज्यामुळे बरेचदा तुम्हाला त्रास होतो.
हत्ती: संपूर्ण मानवजातीबद्दल निःस्वार्थ प्रेम असलेला एक मजबूत आत्मा आहे. तुम्ही इतरांच्या गरजा देपूर्ण करता आणि त्यांचा आदर करता.
कासव: आपण आकलनक्षम आणि संवेदनशील आहात. अस्वलाला प्रथम पाहणे हे माणसातील शौर्य आणि सामर्थ्य दर्शवते.
जिराफ: जर तुम्ही आधी जिराफ पाहिला असेल तर तुम्ही वास्तववादी आणि संयमी आहात.