या गावात लपलेली घंटा दिसतेय का?
ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये दिसणाऱ्या गोष्टी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या असतात की अनेकदा लोकांना त्या समजत नाहीत. पण जे लोक या चित्राकडे लक्षपूर्वक पाहतात, त्यांना त्यात एक लपलेली घंटा दिसेल. चित्रात एक गाव आहे ज्यात एक माणूस कागद घेऊन मुलासमोर उभा आहे, तसेच गावची घरे, झाडे आणि बैलगाडी पाठीमागे उभ्या असल्याचे दिसत आहे.
मुंबई: ज्या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये लपवलेल्या गोष्टी शोधणे थोडे अवघड असते ते आजकाल इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात एका गावात घंटा लपलेली आहे. ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये दिसणाऱ्या गोष्टी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या असतात की अनेकदा लोकांना त्या समजत नाहीत. पण जे लोक या चित्राकडे लक्षपूर्वक पाहतात, त्यांना त्यात एक लपलेली घंटा दिसेल. चित्रात एक गाव आहे ज्यात एक माणूस कागद घेऊन मुलासमोर उभा आहे, तसेच गावची घरे, झाडे आणि बैलगाडी पाठीमागे उभ्या असल्याचे दिसत आहे.
नीट पाहिलं तर ऑप्टिकल इल्यूजन पिक्चरमध्ये लपलेली एक बेलही दिसेल. हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. लोक या फोटोतील लपलेल्या घंटीच्या शोधात गुंतले आहेत. लहान मुले आणि प्रौढांच्या मेंदूची चाचणी घेण्यासाठी म्हणून डिझाइन केलेले हे चित्र एक मनोरंजक कोडे आहे. ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात हातात कागद घेऊन एका माणसाच्या शेजारी उभा असलेला एक मुलगा आपल्याला दिसेल. गावात घरे असून रस्त्याच्या कडेला गवताचा ढिगारा उभारण्यात आला आहे. हा ऑप्टिकल भ्रम आपल्याला चित्राच्या आत लपलेली घंटा शोधण्यास सांगतो.
असा दावा करण्यात आला आहे की केवळ 1% लोकांना या फोटोतील लपलेली घंटा 5 सेकंदात सापडेल. या ऑप्टिकल इल्युजन इमेजकडे बारकाईने पहा आणि गावाच्या चित्रात दडलेली घंटा ओळखण्याचा प्रयत्न करा. लपलेली घंटा सापडणे थोडे अवघड वाटेल, पण चित्रातील गाडीच्या मागच्या घराकडे पाहिले तर लपलेली घंटा कळेल. लपलेली घंटा ओळखणे खूप अवघड आहे कारण ती चतुराईने घराच्या रंगाने झाकली गेली आहे.