इथे एक पक्षी आहे, निरीक्षण कौशल्य वापरा आणि दाखवा कुठाय!
या फोटोमध्ये एक मुलगी काहीतरी खरेदी करताना दिसत आहे. दुकानाच्या काऊंटरवर एक मुलगा दिसत असून तो वस्तू विकत असल्याचेही दिसून येत आहे.
ऑप्टिकल इल्यूजन हा एक असा खेळ आहे जो प्रत्येकाला खेळायला आवडतो. परंतु हा खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता आहे. आम्ही एक अतिशय जबरदस्त चित्र घेऊन आलो आहोत, ज्यात आपल्याला एक पक्षी शोधायचा आहे. या फोटोत एक भाजीचं दुकान दिसत आहे. त्यात अनेक फळे आणि भाज्या दिसतात. या सर्व गोष्टींच्या मधोमध एक पक्षी बसलेला असतो. हा पक्षी तुम्हाला शोधून दाखवायचा आहे. खरं तर नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला होता, तेव्हा एका युजरने लोकांना आव्हान दिलं की, जर सर्व प्रतिभावंतांचा स्वतःवर विश्वास असेल तर याचं उत्तर द्या.
या फोटोमध्ये एक मुलगी काहीतरी खरेदी करताना दिसत आहे. दुकानाच्या काऊंटरवर एक मुलगा दिसत असून तो वस्तू विकत असल्याचेही दिसून येत आहे. हा पक्षी अशा प्रकारे लपवण्यात आलाय की तो दिसणारच नाही. खरं तर या फोटोत दिसणारी मुलगी स्वत:साठी काही फळे विकत घेताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूला अनेक फळे आहेत.
यावेळी सामान विकणारा मुलगा तिला माल देत असतो. गंमत म्हणजे या सगळ्याच्या दरम्यान तो पक्षी दिसतच नाही. खूप चतुराईने तो लपवून ठेवण्यात आला आहे. ऑप्टिकल इल्युजनबद्दल बरेच काही प्रसिद्ध असले तरी खरा ऑप्टिकल भ्रम म्हणजे आपण अचूक उत्तर किती वेगाने शोधतो हे आहे.
हे चित्र अगदी सोपे आहे. तरीही आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगत आहोत. नीट पाहिलं तर दुकानाच्या रिसेप्शन काऊंटरवर चित्राच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या अननसाच्या फळांमध्ये हा पक्षी बसलेला दिसतो. पक्षी आधी दिसत नसला तरी आता दिसतोय, तुम्ही बऱ्याच प्रयत्नाने याचं उत्तर शोधात असाल. पण आम्ही संकेत दिल्यावर तुम्हाला तो पक्षी नक्कीच दिसला असेल.