या चित्रात बेडूक शोधून दाखवा!
जर तुम्हाला विचारले गेले की तुम्ही पाहिलेले ऑप्टिकल इल्युजनचे सर्वात अवघड चित्र कोणते आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही याचे उत्तर देऊ शकणार नाही कारण अशी अनेक छायाचित्रे तुमच्यासमोर आली असतील. यावेळी आणखी एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तुम्हाला त्यात बेडूक कुठे लपलेला आहे हे सांगायचे आहे.
मुंबई: आधीच्या कोड्यांमध्ये आणि आत्ताच्या कोड्यांमध्ये हाच फरक आहे की आधी कोडी तोंडी ऐकून आपल्याला ती मनात रंगवावी लागायची आणि आता जी ऑनलाईन ऑप्टिकल इल्युजनची चित्र आहेत त्यात प्रत्यक्षात सगळंच दिसून येतं. यात फक्त आपल्याला जे सांगितलं जातं ते शोधावं लागतं. यात मग कधी प्राणी शोधावा लागतो, कधी बरोबर स्पेलिंग शोधावं लागतं तर कधी अजून काही शोधावं लागतं. ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधताना तुमचं व्यक्तिमत्त्व सुद्धा कळून येतं.
जर तुम्हाला विचारले गेले की तुम्ही पाहिलेले ऑप्टिकल इल्युजनचे सर्वात अवघड चित्र कोणते आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही याचे उत्तर देऊ शकणार नाही कारण अशी अनेक छायाचित्रे तुमच्यासमोर आली असतील. यावेळी आणखी एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तुम्हाला त्यात बेडूक कुठे लपलेला आहे हे सांगायचे आहे. हे चित्रही काहीसे असेच आहे.
या चित्रात बेडूक अशा ठिकाणी लपला आहे जिथे लोकांची नजर अजिबातच पोहोचू शकणार नाहीत. हा फोटो एका बाथरूमचा फोटो आहे. बाथरूममध्ये सर्व काही व्यवस्थित ठेवल्याचे दिसून येते. बाथरूममध्ये सौंदर्यप्रसाधनेही ठेवली आहेत आणि टॉवेलही ठेवलेली आहेत.
इतकंच नाही तर खुर्चीही दिसते आणि त्यासोबत काही भांडीही दिसतात. ज्यामध्ये फुले दिसतात. याशिवाय एक मोठा गोल आरसा दिसतो. याशिवाय एक बाथटबही दिसत आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये तो बेडूक दिसत नाही. जर तुम्हाला तो बेडूक अजून सापडला नसेल तर खाली आम्ही बेडूक दिसणारे चित्र टाकले आहे.