हे चित्र नीट बघा, यात 280 हा नंबर शोधून दाखवा!
काही छुपी छायाचित्रे शोधण्यासाठी असतात, तर हल्ली काही ऑप्टिकल भ्रम समोर आले आहेत ज्यात हरवलेले आकडे शोधावे लागतात. सध्या हा फोटो समोर आला आहे.
मुंबई: इंटरनेट सर्चमध्ये ऑप्टिकल इल्युजनला खूप प्राधान्य दिले जाते. लोक मजा करण्यासाठी ते ट्राय करतात. असे अनेक ऑप्टिकल भ्रम आहेत जे कोड्यासारखे आहेत, ते आपले व्यक्तिमत्त्व तपासतात. काही छुपी छायाचित्रे शोधण्यासाठी असतात, तर हल्ली काही ऑप्टिकल भ्रम समोर आले आहेत ज्यात हरवलेले आकडे शोधावे लागतात. सध्या हा फोटो समोर आला आहे.
खरं तर या चित्रात तुमच्यासमोर 208 हा अंक आहे. या सगळ्यापैकी तुम्हाला 280 हा अंक शोधण्याचे आव्हान आहे. 2, 0 आणि 8 असे नेमके तीन आकडे असलेल्या या चित्रात 0 आणि 8 हे दोन अंक एकमेकांसारखे दिसतात. त्यामुळे 208 अंकांनी भरलेल्या मॅट्रिक्समधून 280 हा आकडा शोधण्याचे आव्हान मोठे आहे. हे कोडे सोडवण्यासाठी तुम्हाला नीट लक्ष द्यावे लागेल.
जाणून घ्या काय आहे योग्य उत्तर, जर तुम्हाला अजूनही रिझल्ट मिळू शकला नसेल तर जाणून घ्या योग्य उत्तर काय आहे. नीट पाहिलं तर उजवीकडून डावीकडे जाताना तीन नंबरच्या ओळीत, चार नंबरला हा आकडा आहे. हा एकमेव आकडा आहे जो 208 ऐवजी 280 आहे. हे उत्तर तुम्हाला किती पटकन मिळालं याचा अंदाज घ्या. उत्तर अजूनही कळालं नसेल तर खाली उत्तर दाखवतो, बघा.