हे चित्र नीट पहा, यात पांडा शोधून दाखवा!
अशा चित्रांमधून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता पातळी आणि निरीक्षण कौशल्य दिसून येते. आता या फोटो मध्ये तुम्हाला लपलेला पांडा शोधायचाय.
जर तुम्ही इन्स्टाग्राम स्क्रोल करून कंटाळला असाल आणि ऑनलाइन काहीतरी मजेदार शोधत असाल तर ऑप्टिकल इल्युजन हा तुमच्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे. ज्या फोटोंमध्ये लपलेले घटक किंवा वस्तू असतात आणि ते शोधण्याचं आव्हान लोकांना दिलं जातं त्यांना ऑप्टिकल भ्रम म्हणतात. अशा चित्रांमधून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता पातळी आणि निरीक्षण कौशल्य दिसून येते. आता या फोटो मध्ये तुम्हाला लपलेला पांडा शोधायचाय. हा फोटो जुना आहे, यात खूप माणसं दिसतायत, यात एक पांडा सुद्धा लपलेला आहे. हेच कोडं आहे. हा पांडा तुम्हाला 7 सेकंदात शोधायचाय.
वेगवेगळ्या रंगांमुळे उत्तराचा उपाय लवकरच कळतो, पण हे चित्र काळं पांढरं आहे. रंग समान असेल तर उत्तरापर्यंत पोहोचणं थोडं अवघड जातं. हेच कारण आहे की लोक या ऑप्टिकल भ्रमाचं उत्तर शोधण्यात अधिक उत्सुक आहेत. जर आपण चुकीच्या डिटेलिंगवर लक्ष केंद्रित केले तर आपण कधीही पांडा शोधू शकणार नाही.
आपण पांडाची वैशिष्ट्ये विसरणार नाही याची खात्री करा आणि ते शोधण्यासाठी चित्र व्यवस्थित पणे पहा. गर्दीत प्रतिमेच्या उजव्या बाजूला पांडा लपलेला असतो. तो पुरुष आणि स्त्रीच्या अगदी मध्यभागी, गॉगल घातलेल्या पुरुषाच्या वर आहे. जर तुम्ही 7 सेकंदात पांडा शोधू शकलात तर तुमची दृष्टी गरुडापेक्षाही तीक्ष्ण आहे. ज्यांना याचं उत्तर सापडलेलं नाही त्यांनी खाली दिलेला फोटो नीट बघा. काळ्या वर्तुळात आम्ही उत्तर दाखवतोय.