Optical Illusion: चला कोडे सोडवूया! याचं उत्तर शोधायचंय 15 सेकंदात…
आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत ज्याने तुमच्या मेंदूचा चांगलाच व्यायाम होईल.
सोशल मीडियाचे ‘जग’ आजकाल ऑप्टिकल भ्रमांनी भरलेले आहे. ऑप्टिकल भ्रम म्हणजे कोडे. लोकांना कोडी सोडवायला प्रचंड आवडतं. ही नवीन प्रकारची कोडी सोडवताना मेंदूचा चांगला व्यायामही होतो. संशोधनात असे म्हटले आहे की ज्या लोकांना ऑप्टिकल भ्रम आणि मेंदूच्या टीझरसारखे कोडे सोडवण्यात रस आहे अशा लोकांमध्ये इतरांपेक्षा जास्त बुद्ध्यांक पातळी असते.
काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोज आहेत, जे सोडवण्यासाठी मोठमोठ्या हुशारांनाही घाम फुटत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत ज्याने तुमच्या मेंदूचा चांगलाच व्यायाम होईल.
या चित्राची रचना हंगेरियन कलाकार आणि चित्रकार गर्जली दुडास यांनी केली आहे. ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या चित्रांची रचना करण्यात माहिर असलेला कलाकार दुडास तुम्हाला माहीतच असेल. खालील चित्र हे ऑप्टिकल भ्रमाचे अचूक उदाहरण आहे.
चित्रात तुम्हाला अनेक पक्षी दिसतील. त्यातील काहींनी काळ्या रंगाच्या टोप्या घातल्या आहेत, तर एकाने सांताची टोपी घातली आहे. पण कलाकार दुडास यांनीही या पक्ष्यांच्या मधोमध कुठेतरी तपकिरी भोपळा लपवला आहे.
अट अशी आहे की आपल्याला या भोपळ्याला 15 सेकंदात शोधावे लागेल. या चित्रात दडलेला भोपळा शोधून स्वत:ला प्रतिभावंत सिद्ध करायचे असेल, तर वरपासून खालपर्यंत आणि उजवीकडून डावीकडे याकडे पाहा.
ज्यांना अजूनही भोपळा दिसत नाही, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. तुमच्यासाठी, आम्ही उत्तरासह खाली दिलेला फोटो शेअर करत आहोत.