Optical Illusion: या पाव्हण्याची छत्री हरवलीये, द्या शोधून!
ऑप्टिकल इल्यूजन टेस्टमुळे तुमचं निरीक्षण कौशल्य किती अचूक आहे, हे कळू शकतं, असं संशोधन सांगते.
अलीकडच्या काळात ऑप्टिकल इल्यूजन हा इंटरनेटवर एक नवीन ट्रेंड आला आहे. ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा एक वेगळा फॅन बेस आहे, जो केवळ अशी कोडी सोडवण्यात रस दाखवत नाही, तर ते या कोड्यांच्या उत्तरांची आतुरतेने वाट पाहतो. चला असंच एक मजेदार ऑप्टिकल भ्रम बघुयात. या चित्रात आपल्याला लपलेली छत्री शोधावी लागेल. जर तुम्हाला १० सेकंदाच्या आत छत्री सापडली, तर तुम्ही एक उत्तम निरीक्षक आहात.
ऑप्टिकल भ्रम ही अतिशय आकर्षक आणि मनाला भिडणारी चित्रे असतात, जी आपल्या वृत्तीला आव्हान देतात. ऑप्टिकल इल्यूजन टेस्टमुळे तुमचं निरीक्षण कौशल्य किती अचूक आहे, हे कळू शकतं, असं संशोधन सांगते.
आज आम्ही तुमच्यासाठी जी ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट आणली आहे, ती एका रेस्टॉरंटची पेंटिंग आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की काही लोक टेबलवर बसून चहा-कॉफीचा आनंद घेत आहेत.
त्याचबरोबर एक व्यक्ती काऊंटरवर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते. त्या माणसाची छत्री कुठेतरी हरवलेली असते, जी त्याला सापडत नाही. आता तुम्हीच या माणसाला त्याची छत्री शोधण्यात मदत करू शकता.
ऑप्टिकल भ्रम हा आपली निरीक्षण कौशल्ये सुधारण्याचा तसेच आपल्या मेंदूला तीक्ष्ण बनविण्याचा एक चांगला मार्ग आहे. तसेच आपल्या रोजच्या दिनचर्येत छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यांना महत्त्व द्यायला शिकवते.
या चित्रात आपणही सक्रिय असणे गरजेचे आहे. कारण लपवलेली छत्री शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त १० सेकंद आहेत. आम्हाला वाटतं तुम्हाला ती सापडली असेल.
अजूनही तुम्ही जर या चक्रव्यूहात गुरफटलेले असाल, तर काळजी करण्याची गरज नाही. खाली आम्ही उत्तरासह चित्र दाखवत आहोत.