Optical Illusion | या चित्रात शोधून दाखवा हरीण! 5 सेकंदात उत्तर सापडलं तर तुम्हीच हुशार
कधी आपल्याला यात लपलेला एखादा अंक शोधायचा असतो, कधी शब्द, कधी पक्षी तर कधी प्राणी. दरवेळी या चित्रांमध्ये एक नवं चॅलेंज असतं. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची कोडी पटकन सोडवू शकता.
मुंबई: लहानपणी आपण कोडी सोडवायचो ही कोडी तोंडी सोडवली जायची. समोरचा आपल्याला तोंडी कोडं घालायचा आणि आपण तोंडी ते कोडं सोडवून दाखवायचो. आता हीच कोडी ऑनलाइन आलीयेत. या कोड्यांना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन हे फार किचकट असतात. यात अनेक प्रकार असतात. कधी आपल्याला यात लपलेला एखादा अंक शोधायचा असतो, कधी शब्द, कधी पक्षी तर कधी प्राणी. दरवेळी या चित्रांमध्ये एक नवं चॅलेंज असतं. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची कोडी पटकन सोडवू शकता. आता हे चित्र बघा, या चित्रात एक जंगल दिसेल, या जंगलात तुम्हाला लपलेलं हरीण शोधून काढायचं आहे.
ऑप्टिकल इल्युजन
हे चित्र बघा, हे ऑप्टिकल इल्युजनचं व्हायरल होणारं चित्र आहे. या चित्रात घनदाट जंगल दिसेल. या चित्रात झाडे, गवत, सूर्य मावळताना दिसेल. घनदाट जंगलात तुम्हाला हरीण शोधायचं आहे. हरीण लपलेलं नाही. हरीण अशा ठिकाणी आहे जिथे क्वचितच एखाद्याची नजर जाईल. तुम्हाला जर रोज ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा सराव असेल तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला लगेच येईल. ज्याचं निरीक्षण कौशल्य उत्तम त्याला काहीच क्षणात हे हरीण सापडेल.
उत्तर खाली देत आहोत…
हे चित्र नीट बघा. आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं, या चित्रात प्रथमदर्शनी तुम्हाला हरीण दिसणार नाही कारण हे चित्र भ्रम निर्माण करणारं आहे. अशा पद्धतीच्या चित्रांमध्ये तुम्ही डावीकडून उजवीकडे नीट बघा, वरून खाली नीट बघा. एक एक गोष्ट नीट पाहिल्यास तुम्हाला यात हरीण दिसेल. ऑप्टिकल इल्युजनचा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्हाला त्यात काय शोधायला सांगितलंय हे लक्षात ठेवायचं असतं. जे काही शोधायला सांगितलं असेल त्याचा आकार कसा आहे, ते दिसतं कसं, रंग कोणता? या सगळ्या गोष्टी डोक्यात असल्या की ती गोष्ट सहज त्या चित्रात सापडते. मन एकाग्र आणि डोकं शांत ठेऊन तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे. तुम्हाला या चित्रात हरीण सापडलं असेल तर अभिनंदन! जर तुम्हाला यात हरीण दिसलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.