मुंबई: आता हे ऑप्टिकल इल्युजन जरा हटके आहे. या चित्रात तुम्हाला सगळे स्पेलिंग जुळवून एक शब्द तयार करायचा आहे. ऑप्टिकल इल्युजनची चित्रे खूप किचकट असतात. लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता आपण ही कोडी ऑनलाइन सोडवतो. ऑप्टिकल इल्युजन पहिल्यांदा पाहिलं की माणूस गोंधळून जातो. इतका गोंधळतो की त्याला पटकन उत्तर सापडत नाही. ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा सराव असेल तर याचं उत्तर लगेच सापडू शकतं. ऑप्टिकल भ्रमामुळे मेंदूचा व्यायाम होतो, निरीक्षण कौशल्य चांगलं होतं. यात अनेक प्रकार असतात. कधी या चित्रांमध्ये शब्द शोधायचा असतो, कशी अक्षर, कधी अंक तर कधी यात चेहरे शोधायचे असतात.
आता हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला DOG हा शब्द शोधायचा आहे. हे ऑप्टिकल भ्रम जरा हटके आहे. यात तुम्हाला DOG शब्दाचे स्पेलिंग्स दिसतील पण या स्पेलिंग्सची तुम्हाला जुळवाजुळव करायची आहे. सगळीकडे हे तीन शब्द सोडून दुसरं काहीच नाही पण हा शब्द जोडण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर हे सहज शक्य आहे.
प्रत्येक ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नासाठी वेगवेगळी शक्कल लावावी लागते. सगळ्यामध्ये कॉमन काही असेल तर ते आहे निरीक्षण चांगलं असणे. आता तुम्हाला माहित आहे की तुम्हाला कोणता शब्द तयार करायचा आहे. मग तुम्ही याचं उत्तर शोधताना dog या शब्दाचे स्पेलिंग नीट बघून घ्या. एक एक करून शब्द शोधा. तीन शब्द तुम्हाला एकत्र कुठे दिसतायत का बघा. दिसले? आपण वर्तमानपत्रात कसं कोडं सोडवतो तशातला हा प्रकार आहे. नीट निरखून बघा. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! तुम्ही हुशार आहात. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर हरकत नाही आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.