या चित्रात एकूण किती प्राणी आहेत?
ऑप्टिकल इल्युजनचं सौंदर्य म्हणजे ही चित्रं आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला फसवण्यासाठी असतात. अशी चित्रे पाहतात आपल्याला जे दिसतंय तेच सत्य आहे असा विश्वास निर्माण करतात, पण तसे मुळीच नाही. या चित्रात किती प्राणी दिसतायत हे तुम्हाला सांगायचे आहे.

मुंबई: डोळ्यांना फसवणाऱ्या चित्रांना ऑप्टिकल इल्युजनची चित्रे म्हणतात. आज आम्ही एक मस्त चित्र घेऊन आलो आहोत. ऑप्टिकल इल्युजनचं सौंदर्य म्हणजे ही चित्रं आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला फसवण्यासाठी असतात. अशी चित्रे पाहतात आपल्याला जे दिसतंय तेच सत्य आहे असा विश्वास निर्माण करतात, पण तसे मुळीच नाही. या चित्रात किती प्राणी दिसतायत हे तुम्हाला सांगायचे आहे.
हे असे चित्र आहे ज्यात अस्वल उभे असल्याचे दिसत आहे परंतु त्यामागे किती प्राणी बनवले आहेत याबद्दल बराच संभ्रम आहे. ऑप्टिकल इल्युजनचे हे चित्र गोंधळात टाकणारे चित्र आहे. इतकंच नाही तर एखाद्या चित्राविषयी संवाद साधताना आपला मेंदू कसा काम करतो हे समजून घेण्यास ऑप्टिकल इल्युजन शास्त्रज्ञांना मदत करतात.
या फोटोची गंमत म्हणजे जवळजवळ ब्लॅक अँड व्हाईट सारखा दिसणाऱ्या या फोटोमध्ये सर्व प्राणी दिसत नाहीत. अस्वलाच्या मागे अनेक छोटे प्राणीही असल्याचे चित्रात दिसत आहे. परंतु यात किती प्राणी आहेत याचा अंदाज बांधता येत नाही. तुम्हाला दिसतायत का सगळे प्राणी?

Optical illusoin how many animals
प्रत्यक्षात या चित्रात फक्त सहा प्राणी आहेत. यामध्ये अस्वल, कुत्रे, मांजर, वटवाघूळ, माकडे आणि खारुताई यांचा समावेश आहे. यात अस्वल पुढे उभे असते. तर त्याच्या मागे इतर प्राणी असून अस्वलाच्या शेपटीवर खारुताई आहे. सर्व प्राणी दिसत नाहीत असे हे चित्र मांडण्यात आले होते, पण नीट पाहिल्यावर किती प्राणी आहेत हे कळते.