Optical Illusion | या फुलांमध्ये लपलाय खेकडा! दिसला का? सांगा
तुम्हाला या चित्रात खेकडा शोधायचा आहे. लाल रंगाच्या फुलांमध्ये खेकडा शोधणे कठीण वाटेल. पण नीट निरखून बघा. याआधी तुम्हाला खेकडा दिसतो कसा ते माहितेय ना? उत्तर शोधताना प्रश्न काय आहे हे माहित असावं म्हणजे गोंधळायला होत नाही. हे चित्र किचकट आहे पण आम्ही तुम्हाला हिंट देतोय. तरीही उत्तर सापडलं नाही तर आम्ही याचं उत्तर दाखवत आहोत.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतात. लहानपणी आपण कोडी सोडवायचो, ही कोडी तोंडी सोडवली जायची, विचारणारा देखील ही कोडी तोंडीच विचारायचा. आता हीच कोडी ऑनलाइन आली आहेत. ऑनलाइन असल्यामुळे या कोड्यांचे खूप प्रकार असतात. कधी यात आपल्याला अंक शोधायचा असतो. कधी शब्द, तर कधी या चित्रात लपलेले चेहरे शोधायचे असतात. अवघड असलं तरी निरीक्षण कौशल्य जर चांगलं असेल तर या प्रश्नांची उत्तरे कुणालाही सापडू शकतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम, या चित्रांना भ्रम का म्हटलं जातं? प्रथमदर्शनी या चित्रांमध्ये जे दिसतं तेच सत्य असतं असं नसतं. नीट निरखून पाहिलं तर यात नेमकं काय लपलंय ते दिसून येतं, तोपर्यंत हा भ्रम आपल्याला पूर्ण गोंधळून टाकतो.
लाल रंगाची फुले
आता हे चित्र बघा, या चित्रात लाल रंगाची फुले आहेत. यात तुम्हाला खेकडा शोधायचा आहे. आहे ना चॅलेंजिंग? चित्रात खेकडा शोधणं तसं फारसं कठीण नाही. या चित्रात फुलांची गर्दी आहे, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं की माणूस गोंधळून जातो. डोकं शांत, मन एकाग्र केलं की याचं उत्तर लगेच सापडतं. खेकडा शोधण्यासाठी तुम्हाला या चित्राकडे नीट पाहावं लागेल. लाल रंगाच्या फुलांत खेकडा सुद्धा त्याच रंगाची असण्याची शक्यता आहे.
उत्तर सापडलंय का?
तुम्हाला याचं उत्तर सापडलंय का? तुम्हाला खेकडा दिसलाय का? आम्ही सांगतो उत्तर कसं शोधायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधी तर या चित्राकडे नीट बघा. डावीकडून उजवीकडे, वरून-खाली एक-एक फुल बघा, खेकडा दिसला? अजून सोपं करायचं असेल तर तुम्ही या चित्राचा एक-एक भाग नीट बघू शकता. डावा भाग, उजवा भाग, वरचा भाग, खालचा भाग. यात तुम्हाला खेकडा दिसला का? लवकरात लवकर तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे. ऑप्टिकल इल्युजन मध्ये जेव्हा तुम्ही उत्तर शोधता तेव्हा तुम्हाला नक्की काय शोधायचं आहे आणि ते दिसायला कसं आहे हे माहीत असायला हवं. त्याशिवाय हे उत्तर सापडत नाही. आता तरी तुम्हाला यात खेकडा दिसलाय का? दिसला असेल तर अभिनंदन! नसेल दिसला तर हरकत नाही, आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.