Optical Illusion | या चित्रात जिराफ शोधून दाखवा…
हे चित्र अशा प्रकारचे ऑप्टिकल भ्रम आहे जे लोकांच्या विचारांना आव्हान देते आणि निरीक्षण कौशल्याची चाचणी घेते. ऑप्टिकल इल्युजनचे सौंदर्य हे आहे की ते वापरकर्त्यांचे लक्ष कमी कालावधीसाठी गुंतवून ठेवते.
मुंबई: नुकतेच सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे असे चित्र समोर आले आहे, ज्याचं उत्तर शोधण्यासाठी लोकांना बराच वेळ लागतोय. हे एक प्रकारचं कोडं आहे जे खूप कठीण आहे. ऑप्टिकल इल्युजन आपल्या डोळ्यांना फसवते. डोक्यात गोंधळ होतो. इथे या चित्रात तुम्हाला मावळत असलेला सूर्य दिसतो आणि त्यात जिराफ लपलेला आहे.
हे चित्र अशा प्रकारचे ऑप्टिकल भ्रम आहे जे लोकांच्या विचारांना आव्हान देते आणि निरीक्षण कौशल्याची चाचणी घेते. ऑप्टिकल इल्युजनचे सौंदर्य हे आहे की ते वापरकर्त्यांचे लक्ष कमी कालावधीसाठी गुंतवून ठेवते. हे चित्र मनासाठी एक उत्तम व्यायाम आहे. या चित्रात झाडे आणि ढग दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये जिराफ शोधणे आवश्यक आहे.
या चित्राची गंमत म्हणजे हा जिराफ अजिबात दिसत नाही. झाडाभोवती ढग असल्याचे चित्रात दिसत आहे. सूर्याची लालीही दिसत आहे, त्यावरून सूर्यास्तची वेळ असल्याचं दिसतंय. या सगळ्यात तो जिराफ दिसत नाही. या चित्राचे उत्तर फक्त एक टक्केच लोक देऊ शकले आहेत. तुम्हाला या चित्रात जिराफ शोधायचा आहे.
खरं तर, या चित्रात हा जिराफ एका झाडाजवळ उभा आहे आणि फक्त त्याची मान दिसत आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर मध्यभागी झाड आणि सूर्य यांच्यामध्ये दिसणारी आकृती जिराफ आहे. चित्रासोबत जिराफ अशा प्रकारे उभा आहे की तो दिसत नाही. पण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर जिराफ कुठे आहे हे कळते.