Optical Illusion | या चित्रात तीन मुली शोधून दाखवा!
कधी यात आपल्याला एखादं अक्षर शोधायचं असतं, कधी अंक तर कधी यात चेहरे शोधायचे असतात. सगळ्यात अवघड काय असेल ते व्यक्तीनुसार बदलत राहतं. आता हा फोटो बघा, या चित्रात तुम्हाला तीन मुली शोधायच्या आहेत. या चित्रात माणूस दिसतोय आणि यात तुम्हाला तीन मुली शोधायच्या आहेत.
मुंबई: लहानपणी आपण कोडी सोडवायचो. ही कोडी तोंडी सोडवली जायची. समोरचा आपल्याला कोडं घालायचा आणि आपण ती कोडी सोडवायचो, तोंडीच! आता काळ बदललाय. इंटरनेटचं जाळं दूरवर पसरलंय. आता ही ऑप्टिकल इल्युजनची चित्रे ऑनलाइन दिसतात. या चित्रांमध्ये अनेक गोष्टी शोधायच्या असतात. कधी यात आपल्याला एखादं अक्षर शोधायचं असतं, कधी अंक तर कधी यात चेहरे शोधायचे असतात. सगळ्यात अवघड काय असेल ते व्यक्तीनुसार बदलत राहतं. पण याचं उत्तर शोधण्यासाठी तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असायला हवं. तुम्ही नीट निरखून पाहिलंत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कोड्याचं उत्तर सापडू शकतं.
ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम
आता हा फोटो बघा, या चित्रात तुम्हाला तीन मुली शोधायच्या आहेत. या चित्रात माणूस दिसतोय आणि यात तुम्हाला तीन मुली शोधायच्या आहेत. हे चित्र नीट बघा, तुम्हाला यात तीन मुली दिसतायत का? तुम्हाला या मुली लवकरात लवकर शोधायच्या आहेत. अशा कोड्यांची उत्तरे शोधताना आपल्याला डोकं शांत आणि मन एकाग्र ठेवावं लागतं. ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम होतो.
याचं उत्तर देत आहोत
ऑप्टिकल भ्रम असं का म्हटलं जातं? प्रथमदर्शनी या चित्रात आपण जे बघतो तेच सत्य असेल असं नसतं त्यामुळे या चित्रांना ऑप्टिकल भ्रम असं म्हटलं जातं. आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? या चित्रात या माणसाच्या दाढीजवळ, मानेजवळ आणि नाकाजवळ बघा. इथे तुम्हाला काही दिसतंय काय? हे चेहरे या तीन ठिकाणीच लपलेले आहेत. तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर तुम्ही हुशार आहात. नसेल सापडलं तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर देत आहोत.