Optical Illusion | या चित्रात ट्रक शोधून दाखवा!
आपल्याला जे शोधायचं आहे ते कसं दिसतं आणि त्याचा आकार कसा आहे ते लक्षात घ्या. असं केल्यास तुम्हाला उत्तर लवकर सापडेल. आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एकप्रकारचे कोडे आहे. लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो. आता हीच कोडी आपण ऑनलाइन सोडवतोय. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम, भ्रम का म्हणतात? कारण प्रथमदर्शनी आपण या फोटोत जे बघतो तेच सत्य असतं असं नाही बरेचदा सत्य काहीतरी वेगळंच असतं. ऑप्टिकल भ्रम खूप किचकट असतात. या चित्रांची उत्तरे शोधण्यासाठी तुमचा सराव असावा लागतो. रोज एक ऑप्टिकल इल्युजन सोडवलं तरी तुमचा सराव होतो. ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम होतो. सध्या हा प्रकार इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतोय. यात अनेक प्रकार असतात. कधी यात तुम्हाला एखादा अंक शोधायचा असतो, कधी शब्द, कधी अक्षर हे शोधणं कठीण असतं पण निरीक्षण कौशल्य चांगलं असल्यास सहज शक्य आहे.
तुम्हाला ट्रक दिसलाय का?
हे व्हायरल होणारं चित्र बघा. या चित्रात खूप प्राणी आहेत पण यात तुम्हाला ट्रक शोधायचा आहे. हा ट्रक शोधण्यासाठी तुम्हाला चित्र नीट बघावं लागतं. या चित्रात तुम्हाला खूप कार्टून्स दिसतील. कधी कार्टून घोडा दिसेल, कधी अजून कुठला प्राणी, कधी कॅमेरा, कधी गिफ्ट्स, कधी गॉगल लावलेला प्राणी वगैरे वगैरे…पण लक्षात ठेवा तुम्हाला यात ट्रक शोधायचा आहे. तुम्हाला ट्रक दिसलाय का?
उत्तर खाली देत आहोत
ऑप्टिकल इल्युजन बघून पहिल्यांदा माणूस गोंधळून जातो. हे चित्र बघून सुद्धा तुम्ही आधी गोंधळून जाल. डोकं शांत, मन एकाग्र करून तुम्ही जर याचं उत्तर शोधलंत तर तुम्हाला लगेच उत्तर सापडेल. या प्रकारच्या चित्रांमध्ये उत्तर कसं शोधायचं? सोपं आहे, आधी डोकं शांत ठेऊन आपल्याला काय शोधायचं आहे हे लक्षात घ्या. चित्रात डावीकडून उजवीकडे, वरून खाली नीट बघा. आपल्याला जे शोधायचं आहे ते कसं दिसतं आणि त्याचा आकार कसा आहे ते लक्षात घ्या. असं केल्यास तुम्हाला उत्तर लवकर सापडेल. आता तरी तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.