Optical Illusion | हे चित्र नीट बघा, SHOE हा शब्द दिसतोय का?
कोडी सोडवायचा सराव असला पाहिजे. पूर्वीसारखे आता कुटूंबपद्धती राहिलेली नाही. जेव्हा सगळे जमायचे आणि एकेमकांना कोडे टाकायचे, मग जो कोडे सोडवायचा तो हुशार ठरायचा. जो चपळ असायचा त्यालाच याचं उत्तर द्यायला जमायचं. आता हे कोडं बघा आणि याचं उत्तर सांगा.
मुंबई: लहानपणी आपण आजोळी जायचो तिथे गेलं की सगळ्या भावंडांचा मिळून आवडीचा खेळ असायचा कोडे सोडवणे. हे कोडे सोडवताना तुम्हालाही आठवत असेल की किती गोंधळ व्हायचा. आपण सुद्धा कोडे सोडवताना खूप गंभीर असायचो. कारण जो कोडे सोडवायचा तोच हुशार ठरायचा. आता काळ बदलला, वेळ बदलली, ही कोडी आता ऑनलाईन आली आहेत. ही डिजिटल स्वरूपात आलेली कोडी आहेत ज्यांना आपण ऑप्टिकल इल्युजन म्हणतो. विशेष म्हणजे हे कोडे सुद्धा दिलेल्या वेळेत सोडवायचं असतं. ऑप्टिकल इल्युजन हे खूप अवघड असतं पण जर नीट निरखून पाहिलं तर ते अवघड नाही. तुम्ही फक्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
SHOE हा शब्द शोधा
हे चित्र बघा. या चित्रात तुम्हाला SHOE हा शब्द शोधायचा आहे. अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन असतात ज्यात कधीतरी तुम्हाला फरक ओळखा असं सांगितलं जातं, कधी लपलेलं काहीतरी सांगितलं जातं. आता SHEO लिहिलेलं या चित्रात तुम्हाला SHOE हा शब्द शोधायचा आहे. हा शब्द तुम्हाला फक्त आणि फक्त 5 सेकंदात शोधून दाखवायचा आहे. या चित्रात SHEO या शब्दाच्या अनेक ओळी आहेत. कदाचित तुम्ही एक एक ओळ पाहिली तर तुम्हाला याचं उत्तर सापडू शकतं.
प्रत्येक ओळ नीट बघा
तुम्हाला उत्तर सापडलं आहे का? चित्रात SHOE शब्द दिसलाय का? जर तुम्हाला उत्तर दिसलं असेल तर तुम्ही खूप हुशार आहात. जर तुम्हाला उत्तर दिसलं नसेल तर हरकत नाही आम्ही याचे उत्तर तुम्हाला खाली दाखवून देत आहोत. हे एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला प्रत्येक ओळ नीट बघायची आहे. एक एक शब्द जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला हे उत्तर नक्की सापडणार. याआधी जर तुम्ही ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवली असतील तर तुम्हाला हे उत्तर आणखीनच लवकर सापडणार. चला तर मग खालचं चित्र बघा, आम्ही याचं उत्तर खाली दाखवत आहोत.