हवेत तरंगताना दिसला खडक, तासंतास विचार करूनही लोकांना कळेना सत्य !
हा व्हायरल होणारा फोटो तुम्हाला तासंतास विचार करायला भाग पाडेल. पहिल्या नजरेत जे दिसतं त्यावर तुमचा विश्वास असतो. नक्कीच आता बारकाईने पाहताना तुम्ही गोंधळून जाल आणि वास्तव जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल.
बरेचदा सोशल मीडियावरील अनेक फोटो अनेक गोष्ट सांगतात पण त्यामागचं सत्य दिसतं त्यापेक्षा खूप वेगळं आहे. कारण हे चित्र एक भ्रम निर्माण करते आणि आपण अगदी सहज गोंधळून जातो. असे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हा व्हायरल होणारा फोटो तुम्हाला तासंतास विचार करायला भाग पाडेल. पहिल्या नजरेत जे दिसतं त्यावर तुमचा विश्वास असतो. नक्कीच आता बारकाईने पाहताना तुम्ही गोंधळून जाल आणि वास्तव जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल.
खरंच मोठा दगड हवेत उडतोय का?
जेव्हा सत्य समोर येते, तेव्हा आपल्याला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडले जाते. ट्विटरवर ‘हवेत उडणाऱ्या खडकाचा’ असाच एक फोटो व्हायरल झाला आहे, जो पाहून लोकांना समजत नाही की असे का आहे? यामागचे कारण समजून घेण्यासाठी लोक भारावून गेले आहेत. चित्रात एक दगड हवेत उडताना दिसतोय खाली जमीन सुद्धा दिसतेय, परंतु चित्रामागील सत्य काही वेगळंच आहे आणि फोटो पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्याने फोटोखाली एका कमेंटला उत्तर देताना हा खुलासा केला.
This photo is an example of how optical illusions mess with your mind.
First you see a rock floating in the air and then… pic.twitter.com/mbBJeT5ZwC
— Massimo (@Rainmaker1973) March 22, 2023
हा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या मेंदूशी कशा प्रकारे खेळतो याचं हे एक उदाहरण आहे.” जेव्हा एखादा माणूस पहिल्यांदा फोटो पाहतो, तेव्हा प्रत्यक्षात त्याला एक दगड हवेत तरंगताना दिसतो. पण सत्य हे आहे की खडक पाण्यात आहे, जो प्रतिबिंबातून अर्धा खडक दाखवत आहे. हा खडक पाण्यात तरंगतोय असं जेव्हा लोकांना समजतंय तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतोय. हे चित्र पाहून सोशल मीडियावर लोकांचा गोंधळ उडालाय.