चित्रात दिसतंय झाड पण लपलेत ससे! सांगा कुठंयत
आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट घेऊन आलो आहोत.
‘ऑप्टिकल इल्युजन’ असलेली चित्रे केवळ तुम्हाला फसवत नाहीत, तर अक्षरशः भंडावून सोडतात. आपल्याला आपल्याला वाटतं साधं चित्र आहे. पण नंतर लक्षात येतं की हा एक भ्रम आहे. सोशल मीडियावर आजकाल अशाच चित्रांचा पूर आला आहे, ज्यामुळे लोकांची मने विचलित होतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट घेऊन आलो आहोत. हे आहे एका झाडाचं स्केच. या स्केचमध्ये तीन ससे कुठेतरी लपलेले आहेत. 5 सेकंदाच्या आत ते कुठे आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे.
ऑप्टिकल भ्रम असलेल्या बऱ्याच प्रतिमा सोडायला अवघड असतात. हे ब्रेन टीझर सुद्धा असंच काहीसं आहे. 5 सेकंदात ससा सापडणं सोपं नाही.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका झाडाचं स्केच तयार केलं आहे, ज्यावर एकही पानं नाही.
कलाकाराने खूप हुशारीने झाडाच्या फांद्यांमध्ये तीन ससेही कुठेतरी लपवून ठेवले आहेत. हे ससे शोधून दाखवावे लागतात, लक्ष देऊन पाहावं लागतं.
पहिल्याच नजरेत ते फक्त झाडासारखंच दिसेल. पण जेव्हा तुम्ही त्याकडे नीट पाहाल, तेव्हा तुम्हाला त्यात ससेही लपलेले दिसतील.
जर तुम्हाला चित्रात एकही ससा लपलेला दिसला नाही, तर तो शोधून काढायला आम्ही तुम्हाला मदत करू या. झाडाभोवतीच्या फांद्या बारकाईने बघा, तुम्हाला ते तीन ससे तिथेच कुठेतरी दिसतील. सापडले का?