Optical Illusion | मोजून 5 सेकंदात मांजर शोधून दाखवा!
या चित्रात तुम्हाला मांजर शोधायची आहे आणि हेच तुमच्यासाठी आव्हान आहे. ज्यांना ठरलेल्या वेळेत मांजर सापडलं नाही, त्यांच्यासाठी आम्ही बातमीत खाली उत्तर देत आहोत. तुम्हाला उत्तर सापडलं नसेल तर नाराज होऊ नका, हा बातमीतील फोटो बघा. असे कोडे सोडवत राहा म्हणजे तुम्हाला सहज उत्तरं मिळतील.
मुंबई: असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटते की त्यांचे निरीक्षण कौशल्य चांगले आहे आणि त्यांच्यापासून काहीही लपवता येत नाही. अशी माणसे जेव्हा ऑप्टिकल भ्रमाचे कोडे सोडवायला बसतात तेव्हा ते गोंधळून जातात. ते योग्य आणि अयोग्य गोष्टींमध्ये फरक करायला विसरतात. खरं तर ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचं कोडं आहे. ज्यामध्ये गोष्टी अशा प्रकारे तयार केल्या जातात की पाहणारी व्यक्ती पूर्णपणे गोंधळून जाते. गोष्टी अगदी समोर दिसत असल्या तरी आपण अशा जाळ्यात अडकतो की आपल्याला काहीच सुचत नाही. मग अशा कोड्याचं उत्तर सापडता सापडत नाही. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांमध्ये चर्चेत आहे. हा ऑप्टिकल भ्रम सोडवताना तुम्हाला खूप मजा येणार आहे.
तुमच्याकडे फक्त पाच सेकंद
व्हायरल होत असलेला हा फोटो एका कपाटाचा आहे. ज्यात तुम्हाला भरपूर कपडे दिसतील, पण या कपाटात एक मांजर लपलेली आहे. ही मांजर तुम्हाला शोधून काढायची आहे. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर आम्ही असे समजू की तुमच्याकडे गरुडासारखे तीक्ष्ण डोळे आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही आरामात काहीही शोधू शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे फक्त पाच सेकंद आहेत, हे लक्षात ठेवा.
चित्रात मांजर दिसले का?
कोडे सोडवण्यासाठी निरीक्षण चांगलं हवं. चातुर्य हवं. महत्त्वाचं म्हणजे कोडे सोडवण्यासाठी तुम्हाला ठराविक कालावधी दिला जाईल. दिलेल्या वेळातच तुम्हाला कोडे सोडवायचे असते. आता तुम्हाला या चित्रात मांजर दिसले का? जर तुम्हाला पाच सेकंदात मांजर दिसले असेल तर तुम्ही खरंच हुशार आहात. जर तुम्हाला मांजर दिसलं नसेल तर आम्ही खाली याचं उत्तर देत आहोत.