ऑप्टिकल भ्रम फोटो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. चित्रातजसं दिसतं तेच आपण खरे मानून मोकळे होतो. हे एक प्रकारचं कोडं असतं ज्यात आपल्याला एखादी वस्तू शोधायला सांगितलं जातं आणि तेही एका ठराविक वेळेत. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. या ऑप्टिकल इल्युजन इमेजमध्ये तुम्हाला एका गार्डनचं चित्र दिसतं. बागेचे कुंपण आणि झाडांव्यतिरिक्त, या ऑप्टिकल भ्रमात एक लपलेली मांजर देखील आहे.
या चित्रात अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील. जसं की एक गार्डन, त्यातलं कुंपण, झाडं, वेली. पण या गदारोळात मांजर शोधणं खूप कठीण आहे. ऑप्टिकल इल्युजन हा एक कोड्याचा प्रकार आहे. हे कोडं सोडवताना माणसाच्या मेंदूचा व्यायाम होतो. हे एक प्रकारचं ऑनलाईन कोडे आहे. या कोड्यामुळे माणसाची व्यक्तिमत्त्वाची चाचणी आणि निरीक्षण कौशल्याची चाचणी होते.
आपले लक्ष्य 12 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात चित्रातील मांजर शोधण्याचा प्रयत्न करणे आहे. तुम्ही आतापर्यंत मांजर पाहिलं आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला एक संकेत देतो. बागेच्या कुंपणात आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करा.
आता मांजर सापडलं का? तुमच्यापैकी काहीजणांना आत्तापर्यंत मांजर सापडलं असेल. काही लोक असे आहेत जे कदाचित या चित्रात लपलेले शोधू शकत नाहीत. लपलेल्या मांजरीचा रंग बागेच्या कुंपणासारखाच असतो. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना ते सापडत नाही. उत्तर बघायचं असेल तर खालील चित्र बघा त्यात आम्ही दाखवत आहोत.