चिते की चाल, बाज की नजर लावून शोधून दाखवा योग्य स्पेलिंग!
अलीकडच्या काळात अक्षरे किंवा शब्द शोधा अशी बरीच चित्रे समोर येत आहेत, ज्यात शब्दांचे स्पेलिंग चुकीचे आहे किंवा इकडे तिकडे लिहिले आहे. ते शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. असाच एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तुम्हाला सिंह म्हणजेच LION ची योग्य स्पेलिंग शोधावी लागेल.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन आपला आयक्यू लेव्हल तपासण्यासाठी असतं. कधी ते आपलं व्यक्तिमत्त्व तपासतात तर कधी निरीक्षण कौशल्य. याच्या अनेक गंमतीजमती असतात. कधी या चित्रातला फरक शोधायचा असतो तर कधी यात काय चुकलंय हे शोधायचं असतं. कधी कधी या चित्रात सगळ्यात आधी काय दिसतं हे सांगायचं असतं. पूर्वी आपण कोडी सोडवायचो आता आपण तीच कोडी ऑनलाइन सोडवतो आणि त्यालाच ऑप्टिकल इल्युजन म्हणतो. अलीकडच्या काळात अक्षरे किंवा शब्द शोधा अशी बरीच चित्रे समोर येत आहेत, ज्यात शब्दांचे स्पेलिंग चुकीचे आहे किंवा इकडे तिकडे लिहिले आहे. ते शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. असाच एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तुम्हाला सिंह म्हणजेच LION ची योग्य स्पेलिंग शोधावी लागेल.
खरं तर या चित्राची खास गोष्ट म्हणजे एक वगळता सर्व स्पेलिंग्स चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आल्या आहेत. एकच शब्द आहे ज्यात सिंहाचे स्पेलिंग नीट लिहिले आहे, तोच शब्द आपल्याला शोधून सांगावा लागेल. विशेष म्हणजे या चित्रात सिंहाचे चित्रही तयार करण्यात आले आहे. चित्रात तुम्हाला एक मोठा सिंह दिसेल.
या फोटोमध्ये जवळपास 11 उभ्या ओळी असून, त्यामध्ये फक्त सिंहाचे स्पेलिंग दिसत आहे. पण या सर्वांमध्ये स्पेलिंग चुकीच्या पद्धतीने छापलेलं आहे, मधली एकच स्पेलिंग बरोबर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 10 सेकंदात द्यावं लागतं. सापडत नसेल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगणारच आहोत.
खरं तर उत्तर अगदी सोपं आहे, पण अवघड गोष्ट म्हणजे ते खूप लवकर शोधायचं आहे. तुम्हाला अद्याप सापडले नसेल तर शोधा. मधल्या कॉलममध्ये म्हणजेच सहाव्या कॉलममध्ये वरून सहावे अक्षर पहा, नीट पाहिलं तर तुम्हाला योग्य स्पेलिंग दिसेल.