LARGE हा शब्द इथे शोधून दाखवा! आम्ही सांगतो उत्तर कसं शोधायचं…
Optical Illusion चं उत्तर शोधणं कठीण नसतं. याला सरावाची गरज असते. रोज ही कोडी बघण्याचा सराव असेल तर उत्तर देता येतं. शरीराप्रमाणे मेंदूचा सुद्धा व्यायाम महत्त्वाचा आहे. हा व्यायाम कसा होणार? हा व्यायाम कोडी सोडवून होणार. रोज एक ऑप्टिकल इल्युजन सोडवा तुम्हाला वाटेल तुम्हीच हुशार आहात. याची कॉन्फिडन्स साठी मदत होते.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो घेऊन आलोय. या चित्रात तुम्हाला एक अचूक शब्द शोधायचा आहे. या पद्धतीचे चित्र म्हणजे कोडे असतात. ही कोडी आजकाल खूप व्हायरल होतायत. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. या चित्रांना भ्रम का म्हटलं जातं? आपण जेव्हा ही चित्रे पाहतो तेव्हा आपल्याला यात काहीतरी वेगळंच दिसतं. जे आपल्याला दिसतं तेच खरं असतं का? नाही. याची वास्तविकता जशी दिसते तशी नसते. गोंधळून टाकणारं हे चित्र आपल्या मेंदूचा व्यायाम करून घेतं. प्रत्येकालाच या कोड्याचं उत्तर मिळत नाही, ज्या व्यक्तीचं निरीक्षण चांगलं असतं त्या व्यक्तीला याचं उत्तर मिळतं.
कोणता शब्द शोधायचा आहे लक्षात आहे ना?
आता हे चित्र बघा. या चित्रात तुम्हाला सगळीकडे LAGRE हा शब्द दिसेल, यात तुम्हाला LARGE हा शब्द शोधायचा आहे. LARGE हा शब्द शोधणं खूप सोपं आहे फक्त तुम्हाला नीट निरखून बघायची सवय हवी. निरीक्षण चांगलं असल्यास तुम्ही काही सेकंदातच याचं उत्तर शोधू शकता. आम्ही सांगतो तुम्हाला की याचं उत्तर कसं शोधायचं? आता या चित्राकडे नीट बघा, तुम्हाला कोणता शब्द शोधायचा आहे तुमच्या लक्षात आहे ना?
चला, तुम्हाला LARGE हा शब्द शोधायचा आहे. आता तुम्ही एक-एक ओळ वरून खाली बघत चला. तुम्हाला हा शब्द नक्की सापडेल. आणखी एक मार्ग आहे. LAGRE आणि LARGE या शब्दात काय फरक आहे? जो शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे त्या शब्दात तीन नंबरला R आहे. आता तुम्हाला उत्तर शोधताना नेमकं याच अक्षरावर फोकस करायचा आहे. जिथे तीन नंबर स्थानी R दिसेल तो शब्द वाचा. तो शब्द LARGE असेल. नीट पाहिलं तर याचं उत्तर तुम्हाला लगेच दिसेल. विशेष म्हणजे तुम्हाला हे उत्तर काहीच सेकंदात शोधायचं आहे. आम्ही याचं उत्तर खाली देतोय.