मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे कोडे. आपण लहानपणी तोंडी कोडी सोडवायचो आता हीच कोडी ऑनलाइन आली आहेत. ही चित्रे वेगवेगळ्या प्रकारची असतात. या चित्रात कधी चुकीचं स्पेलिंग शोधायचं असतं, कधी दोन चित्रांमधील साम्य शोधायचं असतं तर कधी फरक शोधायचा असतो. या चित्रांचा आपल्याला खूप फायदा होतो. या चित्रांचा वापर आपलं व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी देखील होतो. चांगलं निरीक्षण कौशल्य आणि सुपरफास्ट मेंदू यासाठी आवश्यक असतो. विशेष म्हणजे हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला ठराविक कालावधी दिला जातो आणि त्यातच तुम्हाला याचं उत्तर शोधावं लागतं.
हे चित्र पण असच वेगळं आहे. या चित्रात तुम्हाला कोणता प्राणी दिसतोय हे शोधायचं आहे. हे कोडं खूप मनोरंजक आहे. यात तुमच्या निरीक्षण कौशल्याची खरी परीक्षा आहे. याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर यायला हवं. हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. जर आपण निळ्या रेषा आणि रंगांमध्ये काय आहे हे शोधू शकत असाल तर तज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण नैसर्गिक सोशलाइट आहात.
हे चित्र नीट बघा आणि यात एक प्राणी लपलाय तो कोणता प्राणी आहे ते सांगा? बगळा? मोर? वाघ? जर उत्तर शोधण्यात तुम्ही अपयशी ठरला असाल तर नाराज होऊ नका. आम्ही याचे उत्तर खाली देतोय. पण जर सापडले असेल तर आपल्या लक्षात येईल की हा प्राणी डॉल्फिन आहे. जर तुम्ही बरोबर असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही सोशलाइट होण्यासाठी जन्माला आला आहात.