मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे. हे चित्र इतके व्हायरल होतात तुम्हाला प्रश्न पडत असेल की ऑप्टिकल इल्युजन सारखे चित्र व्हायरल का होतात? या चित्रांच्या मागचा हेतू काय? कशासाठी हे चित्र असतात? ऑप्टिकल इल्युजनमुळे मेंदूचा व्यायाम होतो. ज्या लोकांना असे चित्र सोडवायचा सराव असतो त्यांना सहजच याचं उत्तर सापडतं. ऑप्टिकल इल्युजनमुळे निरीक्षण कौशल्य सुधारतं. जेव्हा हे चित्र समोर येतं तेव्हा लोकं आधी गोंधळून जातात पण या चित्रांचा हेतूच तो असतो. आधी गोंधळून जाणे आणि मग नंतर शांत होऊन उत्तर शोधणे. आपण ज्या ज्या गोष्टी हलक्यात घेतो. ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्या गोष्टी आपल्याला ऑप्टिकल इल्युजन बघायला शिकवतं. आता हे चित्र बघा या चित्रात तुम्हाला 13 कुत्रे शोधायचे आहेत. तुमचं निरीक्षण कौशल्य कसं आहे हे यावरून कळेल.
हे चित्र बघा, समुद्रकिनारा दिसेल. सकाळची वेळ असावी कारण लोक इथे फिरायला आलेले आहेत. कुठं जोडपी आहेत, कुणी एकटं फिरायला आलंय. इतका सुंदर समुद्रकिनारा, लोकं इथे मस्त विश्रांती घेतायत. या चित्रात खूप लोकं कुत्र्याला फिरायला घेऊन आलेत. चित्र जरासं ब्लर आहे पण कुत्रे दिसून येतायत फक्त तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. तुम्हाला यात एकूण किती कुत्रे दिसतायत?
उत्तर सापडलं का? किती कुत्रे दिसले? या चित्रात 2-4 कुत्रे कुणालाही सहज दिसतील पण यात 13 कुत्रे शोधायचे आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो अशा प्रकारच्या ऑप्टिकल इल्युजनचे उत्तर कसे शोधायचे असतात. सर्वात आधी तर तुम्हाला माहिती असायला हवं की आपल्याला जे शोधायचं आहे ते दिसायला कसं आहे? म्हणजे फुल असो किंवा प्राणी, जे शोधायला लावलं आहे त्याचा आकार, रंग, प्रत्यक्षात ते दिसतं कसं हे माहिती असायला हवं. तरच उत्तर शोधणं शक्य आहे. तुम्हाला कुत्रं कसं दिसतं ते माहित आहे का? माहिती असेलच. मग आता यात 13 कुत्रे शोधा.