मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे एक प्रकारचे कोडे. या कोड्याची उत्तरं शोधायला तुमचं निरीक्षण चांगलं लागतं. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम म्हणजेच ऑनलाइन कोडे. कधी यात आपल्याला आधी काय दिसतं हे सांगायचं असतं. तर कधी आपल्याला या दोन चित्रांमधील फरक सांगायचा असतो, कधी आपल्याला यात एखादं अक्षर, एखादी वस्तू शोधायची असते. हा सगळा निरीक्षण कौशल्याचा खेळ असतो. ज्याचं निरीक्षण चांगलं त्याला उत्तर सापडणार आणि तोच खरा हुशार!
एक चित्र व्हायरल होतंय. या चित्रामध्ये तुम्हाला b हा शब्द शोधायचा आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? या चित्रामध्ये सगळीकडे d दिसतोय या सगळ्या d लिहिलेल्या अक्षरांमध्ये तुम्हाला b शोधायचा आहे. प्रश्न वाचताना सोपा वाटतो आणि जसं आपण चित्र बघतो आपण गोंधळून जातो. हे चित्र बघा, गोंधळून गेलात ना? दीर्घ श्वास घ्या आणि चित्राकडे नीट बघा. निरखून बघितल्यास तुम्हाला याचं उत्तर नक्की सापडेल.
तुम्हाला याचं उत्तर सापडलं का? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. आधी एकदा मन शांत करून विचार करा की आपल्याला नेमकं शोधायचं काय आहे. जे शोधायचं आहे त्याच चित्र डोळ्यासमोर आणा. आता या चित्रातील एक एक ओळ नीट बघा. डावीकडून उजवीकडे, वरून खाली एक-एक अक्षर ओळीने बघा. तुम्हाला याचं उत्तर सापडलं का? या d असलेल्या चित्रात b शोधायचा आहे. लवकरात लवकर हे अक्षर तुम्हाला शोधायचं आहे.
तुम्हाला याचं उत्तर दिसलंय का? दहा सेकंदात तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे. नीट निरखून पाहिलं तर हे उत्तर सहज सापडेल. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर उत्तर सापडलं नसेल तर हरकत नाही, आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत. तुम्हाला उत्तर दिसल्यावर नक्की वाटेल, “अरे हे तर समोरच होतं.” अशा प्रश्नांची उत्तरे सोडवायला सराव हवा.