Optical Illusion | तुमच्याकडे आहेत 10 सेकंद, या चित्रात लपलेलं कासव शोधा!
ऑप्टिकल इल्युजन सारख्या किचकट चित्रांमध्ये उत्तर शोधायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारची चित्रे सोडवण्याचा सराव असायला हवा. ऑप्टिकल इल्युजन खूप अवघड असतात. हे चित्र खूप लोकप्रिय आहेत. यात जे शोधायला लावलेलं असतं ते शोधण्यासाठी वेळ सुद्धा ठरवून दिलेली असते. तुम्हाला या चित्रात कासव दिसतंय का सांगा? जर उत्तर दिसलं असेल तर अभिनंदन! दिसलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हे एक कोडे असते. किचकट कोडे सोडवण्यासाठी खूप सराव असायला हवा. ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतं हे सोडवण्यासाठी तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं लागतं. निरीक्षण चांगलं असल्यास सगळ्या प्रकारची उत्तरे शोधणे सहज शक्य आहे. सगळ्या प्रकारची म्हणजे काय? ऑप्टिकल इल्युजनमध्ये अनेक प्रकार असतात. कधी यात तुम्हाला एखादा नंबर शोधायचा असतो, कधी एखादा शब्द, कधी पक्षी, कधी प्राणी तर कधी या चित्रांमधील फरक तुम्हाला शोधायचा असतो. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. याला भ्रम का म्हटलं जातं? प्रथमदर्शनी आपण या चित्रात जे बघतो तेच सत्य असतं असं नसतं. ऑप्टिकल इल्युजन खूप व्हायरल होतंय.
कासव शोधा
आता हे चित्र बघा. हे चित्र जरा हटके आहे. या चित्रात तुम्हाला कासव शोधायचं आहे. हे कासव या हिरव्या रंगाच्या चित्रात कुठेतरी लपलेलं आहे. सगळं हिरवं-हिरवं दिसत असताना कासव दिसणं जरा अवघड आहे. चित्रात फुले, पाने या सगळ्यांची गर्दी दिसून येईल. वेगवेगळ्या आकाराची पाने, फुले यात आता तुम्हाला कासव शोधायचं आहे. जर तुम्हाला माहित असेल की कासव कसं दिसतं तर तुम्हाला नक्कीच सापडेल.
तुम्हाला लपलेलं कासव दिसलंय का?
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधतात. हे चित्र डावीकडून उजवीकडे बघा, उजवीकडून डावीकडे बघा. वरून-खाली नीट बघा. एक-एक पान, फूल नीट बघा तुम्हाला यात नक्की कासव दिसेल. विशेष म्हणजे तुम्हाला याचं उत्तर दहा सेकंदात शोधायचं आहे. ऑप्टिकल इल्युजन सारख्या चित्रात आपल्याला जे शोधायला सांगितलं जातं ती गोष्ट, वस्तू, प्राणी दिसायला कशी असते हे आधी माहिती असायला हवं. आता तरी तुम्हाला लपलेलं कासव दिसलंय का? जर तुम्हाला कासव दिसलं असेल तर अभिनंदन! उत्तर सापडलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली देतोय.