यात सगळ्यात वेगळा असणारा पांडा कुठे आहे, दाखवा शोधून!
Optical Illusion | चित्रातील समजा वस्तू शोधायची असेल तर ती दिलेल्या वेळेत शोधायची असते. अशावेळी मग क्वचितच लोकांना उत्तर सापडतं. सध्या अशाच एका चित्राने लोकांना हादरून सोडलंय. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची दृष्टी गरूडासारखी तीक्ष्ण आहे, तर तुम्ही ही ऑप्टिकल इल्युजन टेस्ट करून पाहू शकता.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन आणि ब्रेन टीझर हे असे फोटो कोडे आहेत, जे समोरच्या व्यक्तीचे मन विचलित करतात. खरं तर कलाकार त्यांची रचना अशा प्रकारे करतात की लोक त्या भ्रमाच्या जाळ्यात अडकून पडतात. चित्रातील समजा वस्तू शोधायची असेल तर ती दिलेल्या वेळेत शोधायची असते. अशावेळी मग क्वचितच लोकांना उत्तर सापडतं. सध्या अशाच एका चित्राने लोकांना हादरून सोडलंय. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची दृष्टी गरूडासारखी तीक्ष्ण आहे, तर तुम्ही ही ऑप्टिकल इल्युजन टेस्ट करून पाहू शकता.
फोटोत सनग्लासेस घातलेल्या पांड्यांच्या गर्दीत सनग्लासेस न घालणारे तीन पांडा आहेत. आजचे आव्हान असे आहे की, तुम्हाला 10 सेकंदात ते तीन पांडा शोधावे लागतील. हे चित्र तुमचे निरीक्षण कौशल्य आणि फोकस या दोघांनाही आव्हान देणारे आहे. हंगेरीचे प्रसिद्ध कलाकार डुदास यांनी याची निर्मिती केली आहे, जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे.
आता वरील चित्र नीट बघा. आता सांगा तुम्हाला सनग्लासेस न घालणारे ते तीन पांडा दिसले का? ते तीन विचित्र पांडा शोधणे आव्हानात्मक आहे.
सनग्लासेस नसलेले तीन पांडा यशस्वीरीत्या सापडले असतील तर अभिनंदन. तुमचे निरीक्षण कौशल्य जबरदस्त आहे. जर अवघड वाटत असेल तर आम्ही खाली उत्तर सांगत आहोत.