Optical Illusion | या कोंबड्यांमध्ये आहेत 3 घुबड, दिसतायत का सांगा?
निरीक्षणामुळे आपले कौशल्यही वाढते, ज्यामुळे तणाव कमी होतो. हंगेरीतील प्रसिद्ध कलाकार गेर्झली डुडास यांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तीन घुबड हुशारीने अनेक कोंबड्यांमध्ये लपून बसले आहेत. ते तीन घुबड तुम्हाला शोधायचे आहेत. हेच आजचे आव्हान आहे. पण यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंद मिळतील.
मुंबई: ऑप्टिकल भ्रम आपले मेंदूचे कार्य आणि एकाग्रता सुधारण्यासाठी ओळखले जातात. निरीक्षणामुळे आपले कौशल्यही वाढते, ज्यामुळे तणाव कमी होतो. हंगेरीतील प्रसिद्ध कलाकार गेर्झली डुडास यांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तीन घुबड हुशारीने अनेक कोंबड्यांमध्ये लपून बसले आहेत. ते तीन घुबड तुम्हाला शोधायचे आहेत. हेच आजचे आव्हान आहे. पण यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंद मिळतील.
मानसशास्त्रज्ञांकडून ऑप्टिकल भ्रम, ब्रेन टीझर सोडवण्याची शिफारस मोठ्या प्रमाणात करण्यात येते. कारण, ते आपल्या गोष्टींकडे पाहण्याची, विचार करण्याची आणि एकाग्रतेची पद्धत प्रभावीपणे सुधारू शकतात. याशिवाय ऑप्टिकल भ्रम सोडवणाऱ्यांचं निरीक्षण कौशल्यही उत्तम असते.
या चित्रात तुम्हाला कोंबड्यांचा एक ग्रुप दिसेल. मात्र, त्या दृश्यात चतुराईने तीन घुबडही लपलेले आहेत. तुम्ही त्यांना ओळखू शकता का? तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.
तुम्ही तीनही घुबड यशस्वीपणे पाहिले असतील तर अभिनंदन. आपले डोळे तीक्ष्ण आहेत आणि निरीक्षण कौशल्य देखील उत्तम आहे. त्याचबरोबर ज्यांनी अद्याप घुबड पाहिलेले नाहीत, त्यांनी अस्वस्थ होता कामा नये. ऑप्टिकल भ्रमाचा हेतू मनोरंजन करणे हा असतो. आमच्या नियमित ऑप्टिकल भ्रम चाचणीत भाग घ्या. तुम्हीही लवकरच त्यात तज्ज्ञ व्हाल. आम्ही खाली एक काउंटर फोटोदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये आम्ही ब्लॅक सर्कलमध्ये सांगितले आहे की ते तीन घुबड कुठे आहेत.