Optical Illusion | हे चित्र बघा, यात ससा शोधून दाखवा!
तुमचं निरीक्षण कसं आहे? या चित्रात तुम्हाला ससा शोधायचा आहे. जर तुम्हाला ससा सापडला नाही तर काळजी करू नका आम्ही याचं उत्तर बातमीत देत आहोत. पण अशा प्रकारच्या फोटोमध्ये उत्तर शोधायचं असेल तर तुमचा सर्व असायला हवा. सराव केल्यास तुम्हला कळेल उत्तर कसं शोधायचं.
मुंबई: कोडे सोडवा हा खेळ लहानपणी आपल्या आवडीचा खेळ असायचा. आपण सुद्धा मोठ्या आवडीने कोडी सोडवायला घ्यायचो. सुट्टीत भावंडं एकत्र आली की एकमेकांना कोडी घालायची आणि आपण ती कोडी सोडवायला घ्यायचो. बरं मग यात पण शाळेत कुणाला कितीही मार्क्स असो, जो हे कोडे सोडवणार तोच खरा हुशार. आपल्याला जर उत्तर आलं तर आपण पण सगळ्या नातेवाईकात भाव खाऊन जायचो. आता काय…गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी! असं का? कारण आता तोंडी कोडी घालायचा आणि ती सोडवत बसायचा काळ गेलाय. आता ही कोडी ऑनलाइन पाहायला मिळतात. या कोड्यांना आपण ऑप्टिकल इल्युजन म्हणतो.
ससा शोधायचा आहे
होय. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच कोडे, ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम! ऑप्टिकल इल्युजनचे चित्र बघूनच माणूस गोंधळून जातो. हे चित्र इतके किचकट असतात की उत्तर शोधता-शोधता दिवस निघून जातो. असंच एक चित्र व्हायरल होतंय. या चित्रात तुम्हाला ससा शोधायचा आहे. आता तुम्ही म्हणाल ससा शोधणं काय अवघड आहे. पण हे एक कोडे आहे, जर कोड्यात ससा शोधायला सांगितला आहे तर नक्कीच अवघड असणार.
ससा कुठं-कुठं शोधायला हवा?
हे चित्र बघा, या सुंदर चित्रात तुम्हाला एक टुमदार घर दिसेल, हिरवेगार डोंगर दिसतील, झाडे दिसतील, नद्या दिसतील आणि ढग सुद्धा दिसतील. यात तुम्हाला ससा शोधायचा आहे. आता या कोड्यात उत्तर शोधताना जरासं डोकं लावायची गरज आहे. तेवढं केलं की लगेच तुम्हाला याचं उत्तर सापडेल. ससा कोणत्या रंगाचा असतो? मग या चित्रात सशाच्या रंगाचं काय आहे? मग तुम्ही ससा कुठं-कुठं शोधायला हवा? या प्रश्नांची योग्य उत्तरं जर तुम्हाला सापडली तर तुम्हाला ससा शोधायला वेळ लागणार नाही.
निरीक्षण चांगलं असेल तर
ऑप्टिकल भ्रमाचे उत्तर शोधण्यासाठी तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं असणं गरजेचं आहे. निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला काही सेकंदातच याचं उत्तर सापडू शकतं. जर तुम्हाला यांचं उत्तर सापडलं असेल तर तुमच्या इतकं हुशार कुणीच नाही. पण जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर हरकत नाही आम्ही तुम्हाला याचं उत्तर खाली दाखवून देत आहोत.