हा फोटो तुमचे गुण सांगतो! सांगा आधी काय दिसतंय?
हा फोटो पाहून पहिल्याच वेळात तुम्हाला काय दिसतंय ते सांगा बघू. फोटो जरी एकच वाटत असला तरी यात दोन गोष्टी लपलेल्या आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या मेंदूची परीक्षा घेत असतात तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वातील काही गुणांबद्दलही सांगतात. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन तुम्हालाही आवडणार आहे. हा फोटो तुमच्या व्यक्तिमत्त्वाची एक गोष्ट नकळत समोर आणतो. फोटोमध्ये आधी तुम्हाला काय दिसतं याला फार महत्त्व आहे. हे सगळं तुमच्या निरीक्षण कौशल्यावर सुद्धा ठरतं.
हा फोटो पाहून पहिल्याच वेळात तुम्हाला काय दिसतंय ते सांगा बघू. फोटो जरी एकच वाटत असला तरी यात दोन गोष्टी लपलेल्या आहेत.
एक आहे पांढऱ्या दाढी वाल्या व्यक्तीचा चेहरा. दुसरा आहे महिलेचा फोटो. पण ज्या व्यक्तीला आधी यात लपलेली महिला दिसते ती व्यक्ती अतिशय हुशार असते.
हा फोटो पाहिल्यानंतर लगेचच तुम्हाला त्या महिलेचा चेहरा शोधावा लागेल. चेहरा जितक्या लवकर दिसेल, तितक्या लवकर तुमच्या व्यक्तिमत्त्वात त्या एका गुणाचं प्रमाण जास्त असतं.
स्त्रीचा चेहरा दिसला म्हणजे तुमच्याकडे निरीक्षणाचे उत्तम कौशल्य आहे. तुम्ही जर अवघ्या 3 सेकंदात महिलेचा चेहरा पाहिला तर अभिनंदन! निरीक्षण कौशल्य तुमच्यात चांगल्या प्रमाणात उपस्थित आहे.
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा वेळ 3 सेकंदांवरून 7 सेकंदांपर्यंत वाढवू शकता. पण तरीही जर तुम्हाला योग्य उत्तर मिळालं नाही तर हरकत नाही.
उत्तर मिळालं नसेल, तर थोडा दृष्टिकोन बदलण्याची गरज होती. हा फोटो उलटा पाहताच तुम्हाला त्या स्त्रीचा चेहरा अगदी सहज दिसेल आणि तुम्हीही प्रतिभावान व्यक्तींच्या यादीत सामील व्हाल.