ऑप्टिकल इल्युजन! सांगा आधी काय दिसतंय, फोटोच सांगेल तुमचं व्यक्तिमत्त्व
आता वरचा फोटो बघा! तुम्हाला या फोटोत काय दिसतंय यावर तुमचं व्यक्तिमत्त्व ठरतं. एकावेळी या चित्रात तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसू शकतात. पण पहिल्यांदा काय दिसतंय ते जास्त महत्त्वाचं आहे.
ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बरंच काही ठरवतो. नुसत्या चित्राकडे बघून तुम्हाला आधी काय दिसतंय, किती स्पष्ट दिसतंय हे सगळं अवलंबून असतं. माईंड टिझर म्हणून या गोष्टी बऱ्याच प्रचलित आहेत. चित्रात दडलेलं हे एक प्रकारचं कोडं असतं. पण त्यावर तोडगा काढण्यात एक ते दोन टक्केच यशस्वी होतात.काही लोकांसाठी हा विनोदाचा खेळ असतो. लोक वेळोवेळी पझल टेस्ट करून आपल्या मेंदूचा व्यायाम करत असतात. ऑप्टिकल इल्यूजन किंवा कोडी सोडवणाऱ्यांची बुद्ध्यांक पातळी जास्त असते, असंही संशोधन सांगते. प्रत्येक गोष्टींकडे बघण्याची त्यांची एक वेगळी पद्धत आहे हे अशा प्रकारचे चित्रंच दाखवून देतात.
आता वरचा फोटो बघा! तुम्हाला या फोटोत काय दिसतंय यावर तुमचं व्यक्तिमत्त्व ठरतं. एकावेळी या चित्रात तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसू शकतात. पण पहिल्यांदा काय दिसतंय ते जास्त महत्त्वाचं आहे.
चित्रात एक झाड आहे. या झाडाव्यतिरिक्त यात ३ प्राणी आणि एक पक्षी आहे. तुम्हाला काय दिसतंय आधी? प्राणी, झाड, पक्षी जे आधी दिसेल त्यावर तुमचं व्यक्तिमत्त्व ठरेल.
जर तुमची नजर आधी झाडांकडे किंवा पक्ष्यांकडे गेली तर तुम्ही एक प्रामाणिक आणि विवेकी व्यक्ती आहात. तुम्ही नेहमीच सकारात्मक विचार करता आणि तुमचे मित्र बऱ्याचदा तुमच्याकडून सल्ला घेण्यासाठी येतात.
जर तुम्ही गोरिला प्रथम पाहिलात, तर तुम्ही तुमच्या ग्रुपचे मिस्टर किंवा मिस जिज्ञासू आहात. तुम्ही अगदी विश्लेषणात्मक आहात.तुम्ही गोष्टींमध्ये नेहमीच सखोल जाता, वरवर अभ्यास करणं तुम्हाला मान्य नाही. याशिवाय समस्यांवरही तुम्ही उपाय शोधतात. तुम्ही स्वत:हून काम करता, कोणाला त्रास देत नाही. याशिवाय तुम्ही खूप हट्टी आहात.
सिंहाला प्रथम पाहिले असेल तर तुमचे व्यक्तिमत्त्व खूप बलवान आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयाची जाणीव आहे आणि ते तुम्हाला साध्य होते. तुम्हाला जोखीम घेणे आवडते.