Optical Illusion | या चित्रात 3 मुली शोधून दाखवा!
आता तरी तुम्हाला या 3 मुली दिसलेल्या आहेत का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत. खालचं चित्र नीट बघा. अशा प्रकारचे जेव्हा कोडी येतील तेव्हा तुम्हाला सोडवणं आता सोपं जाईल. हे उत्तर शोधणं सोपं असतं पण आपण आधी नीट निरखून पाहायला हवं. आता या चित्राकडे नीट बघा, तुम्हाला याचं उत्तर सापडलं का?
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी तुम्हाला यात एखादा नंबर शोधायचा असतो, कधी चुकीचं स्पेलिंग शोधायचं असतं, कधी दोन चित्रांमधील फरक शोधायचा असतो. ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतं, हे एक प्रकारचं भ्रम असतं. चित्रात जे तुम्ही आधी बघाल तेच सत्य असेल असं नसतं, प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच असतं आणि म्हणूनच याला भ्रम असं म्हणतात. ऑप्टिकल भ्रमाचं उत्तर कमीत कमी वेळात शोधायचं असतं. मेंदूचा व्यायाम करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन चांगले असतात. रोज एक ऑप्टिकल इल्युजनचा प्रकार सोडवून बघितला तर आपल्याला असे कोडे सोडवायची सवय होते आणि आपण ते कमी वेळात शोधून दाखवू शकतो. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर लगेच सापडतं. आता हे व्हायरल होणारं चित्र बघा, या चित्रात काय शोधायचं आहे ते बघुयात…
फक्त माणूसच दिसतोय का?
हे चित्र बघा, यात तुम्हाला एक माणूस दिसेल. नीट बघा, काय फक्त माणूसच दिसतोय का? यालाच खरं भ्रम म्हणतात. यात तुम्हाला फक्त एका माणसाचा चेहरा दिसेल पण या चित्रात 3 मुली आहेत. धक्का बसला ना? होय, या चित्रात तुम्हाला 3 मुली शोधून दाखवायच्या आहेत. एक दाढीवाला माणूस असलेल्या चित्रात 3 मुली शोधायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की यात मुली कुठे आहेत. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की सापडेल.
एकूण 3 मुली शोधा
आम्ही सांगतो या ऑप्टिकल भ्रमाचं उत्तर कसं शोधायचं. आता हे चित्र बघा, या माणसाचं नाक, कपाळ, केस, मान, गळा या सगळ्याच्या आसपास चेहऱ्याची आकृती दडलेली असते. जेव्हा ऑप्टिकल इल्युजनची चित्रे देऊन माणूस, मुली, स्त्री, प्राणी असं काही शोधायला सांगितलं जातं तेव्हा ते सहसा आकृत्यांमध्ये असतं. या आकृत्या, हा शेप आपल्याला शोधायचा असतो. यात तुम्हाला एकूण 3 मुली शोधायच्या आहेत. याचं उत्तर तुम्हाला सापडलं आहे का? आम्ही हिंट देतो, 3 मुलींपैकी एका मुलीचा चेहरा या माणसाच्या दाढीजवळ आहे, एक नाकाजवळ आहे आणि एक मानेजवळ आहे.