झोमॅटोवर फूड ऑर्डर करणे किती महाग? सोशल मीडियावर बिल व्हायरल
zomato: सोशल मीडियावरील या पोस्टची दखल झोमॅटोनेही घेतली आहे. Xवर Zomato Care ने त्याला उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्हाला तुमची अडचण लक्षात आली. आम्ही हे प्रकरण तपासून पाहू. तसेच युजरला ऑर्डर ID आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर शेअर करण्याची विनंती केली आहे.
फूड डिलिवरी प्लेटफॉर्म Zomato आणि Swiggy कडून आपल्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मोजक्या शहरांमध्ये झाली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे. आता सोशल मीडियावर एका युजरने एका बिलाचा फोटो शेअर केला आहे. त्यानुसार झोमॅटोवरुन फूड मागवणे चांगलेच महागात पडत आहे. हे बिल व्हारलर झाल्यानंतर झोमॅटोकडून त्यावर प्रतिक्रिया आली आहे.
सोशल मीडियावर बिल व्हायरल
X प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये रेस्टारंटचे बिल आणि झोमॅटोमधील बिल दाखवले गेले आहे. दोन्ही बिलांमध्ये खूपच फरक असल्यामुळे हे बिल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे. त्यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. Kannan नावाच्या युजरेने पोस्ट करत लिहिले आहे की, माझ्या काकांना एका रेस्टरंटमधून फूड मागवले. त्याच रेस्टंरटमधील तेच फूड झोमॅटोमध्ये चेक केले. त्या दोघांमधील फरक किती? हे त्या युजरने बिलासह दिले आहे.
दोन्ही बिलांमध्ये 183 रुपयांचा फरक
पोस्टमध्ये दोन्ही बिलांमधील फरक दाखवला आहे. रेस्टॅरंट आणि झोमॅटोवरुन मागवलेल्या बिलात 183 रुपयांचे फरक आहे. रेस्टारंटचे बिल 803 रुपयांचे आहे. त्यात सर्व करांचा समावेश केला आहे. त्यानंतर तेच फूड झोमॅटोबर 987 रुपयांमध्ये मिळत आहे. 16 जुलै रोजी केलेल्या या पोस्टला 3.2 दक्षलक्षपेक्षा जास्त व्ह्यूव मिळाल्या आहेत. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिला आहे. अनेकांनी ती पोस्ट रिट्विट केली आहे. एका युजरने लिहिले की झोमॅटो ही काही एनजीओ नाही. ते नफा कमवणारच आहे. दुसरा युजर म्हणतो, कंपनी डिलेव्हरी बॉयला पैसे देते. त्याच्या गाडीच्या पेट्रोलवर खर्च होतो. त्यामुळे तो पैसा ग्राहकाकडून घेणार ना?
My uncle ordered food from Murugan idly shop . See the Price difference between @zomato and actual . pic.twitter.com/R83rVHKJhZ
— Kannan (@Kannan__TS) July 16, 2024
झोमॅटोनेही घेतली दखल
सोशल मीडियावरील या पोस्टची दखल झोमॅटोनेही घेतली आहे. Xवर Zomato Care ने त्याला उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्हाला तुमची अडचण लक्षात आली. आम्ही हे प्रकरण तपासून पाहू. तसेच युजरला ऑर्डर ID आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर शेअर करण्याची विनंती केली आहे.