चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट नेमकं कधी पृथ्वीवर पडू शकतं? जीवसृष्टीला धोका काय?

अंतराळात चीनकडून तयार करण्यात येत असलेल्या स्पेस स्टेशनसाठी हे रॉकेट पाठवण्यात आले होते. (Chinese Long March Rocket Space debris)

चीनचं 'ते' अनियंत्रित रॉकेट नेमकं कधी पृथ्वीवर पडू शकतं? जीवसृष्टीला धोका काय?
Chinese Long March Rocket Space debris
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 11:56 AM

बीजिंग : चीनचं आऊट ऑफ कंट्रोल झालेलं रॉकेट येत्या वीकेंडला पृथ्वीवर कोसळण्याची भीती आहे. लाँग मार्च 5- बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) रॉकेट शनिवार 8 मे किंवा रविवारी पृथ्वीवर पडण्याचा धोका आहे. मात्र याआधीही अशाप्रकारचा अंतराळ कचरा (space debris) पृथ्वीवर धडकला असून त्याने पृथ्वीतलावरील कोणाच्याही जीवाला धोका निर्माण झाला नव्हता. त्यामुळे घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. (Out of control Chinese Long March 5B Y2 Rocket Space debris to crash into earth this weekend)

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर बहुतांश अंतराळ कचरा हवेतच जळून जातो. क्वचित असे विशाल तुकडे पृथ्वीच्या पृष्ठभागावर धडकले आहेत. गेल्या वर्षी अनियंत्रित स्पेस डेब्रीज लॉस अँजलस आणि न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या आकाशातून पास होऊन अटलांटिक ओशनमध्ये पडल्या होत्या, हे अलिकडच्या काळातील उदाहरण. तेव्हाही त्याचा जीवसृष्टीला धोका पोहोचला नव्हता.

चीनने टेंशन वाढवलं

अंतराळात चीनकडून तयार करण्यात येत असलेल्या तियानहे स्पेस स्टेशनसाठी (Tianhe Space Station) हे रॉकेट अंतराळात पाठवण्यात आले होते. मात्र, पृथ्वीवर परतत असताना चीनचे या रॉकेटवरील नियंत्रण सुटले.

उपग्रहांना धोका कायम

अनियंत्रित अंतराळ कचरा पृथ्वीवर आदळणे ही दुर्मीळ घटना आहे. स्पेस एजन्सीज नियंत्रणाबाहेर असलेल्या विशाल अंतराळीय वस्तू तशाच सोडून देणं टाळतात. मात्र अशा वस्तूंमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला कमी धोका असतो. परंतु हवामान किंवा पृथ्वीवरील वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या उपग्रहांना त्यामुळे हानी पोहोचण्याची भीती असते.

अमेरिका ‘ते’ अनियंत्रित रॉकेट ‘उडवणार’ नाही

दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने आता नियंत्रणबाह्य चिनी रॉकेट उडवण्याची (शूट डाऊन) योजना नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी माहिती दिली. हे रॉकेट समुद्र किंवा तत्सम मोकळ्या जागेवर कोसळून कोणालाही हानी पोहोचणार नाही, अशी आशा ऑस्टिन यांनी व्यक्त केली.

रॉकेटचे वजन तब्बल 21 टन

मिळालेल्या माहितीनुसार अंतराळात सध्या रॉकेटचा मुख्य भाग फिरतो आहे. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब आहे. याचे वजन तब्बल 21 टन आहे.

रॉकेटचा वेग 7 किमी प्रतिसेकंद

पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) असे आहे. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत आहे. म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीपासून 170 ते 372 किलोमीटर उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रॉकेटची रुंदी 16 फूट असून चीनने त्याला 28 एप्रिल रोजी अंतराळात सोडले होते. त्यावेळी जल्लोष करतानाचा व्हिडीओ चीनच्या अधिकाऱ्यांनी शेअर केला होता. (Out of control Chinese Long March 5B Y2 Rocket Space debris to crash into earth this weekend)

पाहा त्यावेळच्या जल्लोषाचा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

चीनचं रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, ‘या’ देशांवर कधीही कोसळण्याची शक्यता, पृथ्वी संकटात ?

(Out of control Chinese Long March 5B Y2 Rocket Space debris to crash into earth this weekend)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.