पान बर्गर! पूर्ण व्हिडीओ बघून लोकं म्हणाले, “डोकं खराब केलं याने…”
गोड आवडणाऱ्या लोकांसमोर तर नेहमीच काही ना काही विचित्र कॉम्बिनेशन येत असतात. पान बर्गर नावाचा एक असाच प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विचित्र फूड कॉम्बिनेशनच्या यादीमध्ये आता आणखी एक पदार्थ जोडला गेलाय.
मुंबई: जेव्हा आपल्याला वाटते की आता आपण सगळ्या प्रकारचं पदार्थ खाल्लेले आहेत तेव्हाच एखादा असा पदार्थ समोर येतो आणि आपल्याला धक्का बसतो. आत्तापर्यंत आपण इंटरनेटवर दाल मखनी आईस्क्रीम रोलपासून ते मॅगी पाणी पुरी आणि चॉकलेट बिर्याणीपर्यंत सर्व काही पाहिलं आहे आणि प्रत्येक वेळी आपण थक्क होतो. गोड आवडणाऱ्या लोकांसमोर तर नेहमीच काही ना काही विचित्र कॉम्बिनेशन येत असतात. पान बर्गर नावाचा एक असाच प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विचित्र फूड कॉम्बिनेशनच्या यादीमध्ये आता आणखी एक पदार्थ जोडला गेलाय. एका पाकिस्तानी फूड पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘बर्गर पान’ असे कॅप्शन दिले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पॉप्युलर पान बर्गर बनवत आहे. सुपारीबरोबरच कठ्ठा, बडीशेप, गुलकंद अशा अनेक गोष्टी त्यांनी ठेवल्यात. इतकंच नाही तर सुपारीच्या पानावर बदाम, गोड बडीशेप, चॉकलेट आणि इतर अनेक गोड पदार्थ असे ड्रायफ्रुट्स ठेवले जातात. त्यानंतर दुकानदार मेयोनीजऐवजी पानाच्या शेवटी फ्रेश क्रीमची लावतो. शेवटी त्याने काय केले याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तो ब्रेडचा बन घेतो आणि मध्यभागी कापून त्यात बनवलेला पान ठेवतो.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या अशा प्रतिक्रिया
View this post on Instagram
या व्हिडिओला आतापर्यंत सहा हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून इन्स्टाग्राम युजर्सकडून या व्हिडिओला अतिशय विचित्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीही असंच काहीसं म्हणाल. एका इन्स्टाग्राम युजरने लिहिलं की, “या बर्गरच्या चवीची कल्पना केल्यावर उलटी झाली,” तर दुसऱ्याने कमेंट केली, “हे खूप घृणास्पद दिसते.”