Video: महाकाय व्हेल बोटीजवळ आली, महिलेसोबत खेळली, बोटीला धक्काही दिला, वाढदिवसाच्या दिवशीच महिलेसोबत भर समुद्रात काय काय झालं?

आधी ही व्हेल या बोटीभोवती घिरट्या घालत होती. मात्र नंतर ती बोटीसोबत खेळण्यास सुरुवात करते. ती आधी पाण्यात डुबकी मारते, अगदी बोटीखाली येते आणि आपल्या फिनने बोटीला हळूच धक्का मारते.

Video: महाकाय व्हेल बोटीजवळ आली, महिलेसोबत खेळली, बोटीला धक्काही दिला, वाढदिवसाच्या दिवशीच महिलेसोबत भर समुद्रात काय काय झालं?
ड्रोन पायलट मॅक्सी जोनास यांना हा प्रसंग दिसला आणि त्यांनी हवेतून या सगळ्याचं चित्रिकरण करणं सुरु केलं
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 12:16 PM

निसर्गात कधी काय होईल सांगता येत नाही, निसर्ग कधी कधी आपलं असं रुप दाखवतो, ज्यावर माणसाला विश्वास ठेवणं अवघड होऊन बसतं. प्राण्यांचं जगही असंच आहे. आपण स्वत:ला जरी हुशार समजत असलो, तरी प्राणी हे आपल्याहून कित्येक पटीने हुशार आहेत हे आपण विसरुन जातो. असेच काही प्रसंग घडतात, की जे एखाद्याला सांगितले तर त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. पण, नशीबाने कॅमेरा नावाची एका संशोधनाने माणसाला या प्रसंगावर विश्वास ठेवण्यास भाग पाडलं आहे. असाच एक प्रसंग ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो कदाचितच कुणी पाहिला असेल. ( paddle boarder’s close encounter with two curious whales in Argentina drone video)

वाढदिवसाचं भन्नाट गिफ्ट

असाच एक प्रसंग अर्जेंटिनाच्या समुद्रात घडला आहे. जिथं आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एक पॅडल बोर्डर ( paddle boarder) समुद्रात बोट घेऊन गेली. मात्र, त्यानंतर जे घडलं, त्याने या महिलेचा हा वाढदिवस अविस्मरणीय करुन टाकला. या महिलेचं नाव आहे अॅनालिया जियोर्जेटी. ( Analia Giorgetti.) जी एक पॅडल बोर्डर आहे. अर्जेंटिनाच्या (Argentina) समुद्रात ही महिला आपली पॅडल बोट घेऊन गेली. तेवढ्यात तिथं 2 जाएंट व्हेल (whales) आल्या. ती आधी घाबरली आणि नंतर शांत झाली. त्यातील एका व्हेलला अॅनालियाच्या बोटीबद्दल आकर्षण निर्माण झालं, आणि ही व्हेल तिच्या बोटीजवळ घिरट्या घालू लागली. विशेष म्हणजे हे जेव्हा होत होतं, तेव्हा एक ड्रोन कॅमेरा हवेत होता, ड्रोन पायलट मॅक्सी जोनास (photographer Maxi Jonas) यांना हा प्रसंग दिसला आणि त्यांनी हवेतून या सगळ्याचं चित्रिकरण करणं सुरु केलं.

व्हेल बोटीसोबत का खेळत होती?

या व्हेलचा आकार या बोटीपेक्षा कित्येक पटीने मोठा होता, वजन तर शेकडो टनांमध्ये असेल. ही व्हेल एका फटक्यात बोट बुडवू शकत होती. पण तिला ते करायचं नव्हतं. असं वाटत होतं की, ही व्हेल अॅनालियाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. ड्रोल पायलट मॅक्सी यांच्या मते, “असं दिसत होतं की व्हेल बोर्डवर बसलेल्या महिलेचं लक्ष्य आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. ज्याप्रकारे कुत्र्याचं लहान पिल्लू जेव्हा कुणासोबत खेळण्याचा प्रयत्न करतं. तसंच व्हेलही करत होती.”

बोटीला व्हेलने दिलेला तो धक्का!

आधी ही व्हेल या बोटीभोवती घिरट्या घालत होती. मात्र नंतर ती बोटीसोबत खेळण्यास सुरुवात करते. ती आधी पाण्यात डुबकी मारते, अगदी बोटीखाली येते आणि आपल्या फिनने बोटीला हळूच धक्का मारते. पण यामध्ये तिला या महिलेला नुकसान पोहचवायचं नसतं हे साफ दिसतं. हा धक्का फक्त बोट पुढे सरकेल इतक्याच क्षमतेचा असतो, जसं लहान मुलं सायकलला धक्का मारतात.

पाहा व्हिडीओ:

व्हेलने दिलेला तो अविस्मरणीय क्षण

नंतर ती व्हेल बोटीच्या खाली उलटी-पालटी होत राहते, अगदी लहान पिल्लासारखे तिचं कृत्य आहे. ती सरळ बोटीखाली येते, पण वरती येत नाही, तर खालीच राहून खेळत राहते, जर ती वरती आली असती तर बोट उलटली असती, पण तिला ते करायचं नव्हतं हे साफ इथं दिसतं. त्यानंतर काहीच वेळात दुसरी व्हेल इथं येते आणि ही व्हेलही तिच्यासोबत आपला प्रवास सुरु करते. या बोटीला बाय बाय करत ती आपल्या मार्गाकडे रवाना होते. पण मागे सोडून जाते, एक अविस्मरणीय क्षण, जो कधीही कुणाच्या नशीबी आला नाही.

कधीही न घडलेला प्रसंग कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडीओ अतिशय सुंदर आहे, कदाचित ही महिला अतिशय भाग्यवान होती, जिच्यासोबत खेळण्यासाठी खुद्द ही महाकाय व्हेल आली, आणि तेही तिच्या जन्मदिनी. असं नशीब कदाचित कुणाचंही नसेल. विशेष म्हणजे, हे सगळं जर कॅमेऱ्यात कैद झालं नसतं तर कुणीही त्यावर विश्वास ठेवला नसता. निसर्ग त्याचं अद्भूत रुप नेहमी दाखवत राहतो, पण माणूस त्याकडे कायम दूर्लक्ष करतो. निसर्गापुढे कुणीही नाही आहे, याची जाणीव नेहमी आपल्याला असायला हवी. आणि हेच या व्हिडीओतून सारखं जाणवत राहतं.

हेही पाहा:

Video: 2 कोल्ह्यांवर 1 मांजर भारी, मांजरीला यापुढे भित्री म्हणण्याआधी तिच्या धाडसाचा हा व्हिडीओ पाहा

Video: माकडाला जबरदस्ती केळी खाऊ घालण्याचा प्रयत्न अंगाशी, माकडाने चिडून जे केलं, त्यावर नेटकरी अवाक

 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.