मुंबई : सध्या दिवाळीची धूम आहे. सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जातोय. भारतीय नागरिकांचे पूर्ण जगात वास्तव्य असल्यामुळे जवळपास संपूर्ण जगात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विदेशातील राजकीय नेत्यांनीदेखील दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या मात्र दिवळीच्या पार्श्वभूमीवर अशाच एका नेत्याचे ट्विट प्रंचड व्हायरल होत आहे. या नेत्याने दिवळीचा सण असताना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे हा नेता पाकिस्तामधील आहे. त्याने दिलेल्या सुभेच्छांचे स्क्रीनशॉट सध्या सगळीकडे शेअर केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील सिंध या प्रतांचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास ट्विट केले होते. त्यांना सिंध प्रांतातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. मात्र, चांगलाच घोळ झाला. त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर दिवळीचा सण सुरु असताना होळीच्या शुभेच्छांचे पोस्टर झळखले. हा प्रकार समोर आल्यानंतर मुराद अली शाह यांना चांगलेच ट्रोल केले गेले. त्यांनी हॅपी दिवाळी म्हणण्याऐवजी हॅपी होळीचे पोस्टर्स शेअर केले.
हा प्रकार समोर येताच शाह यांनी ते ट्विट डिलीट केले. मात्र तोपर्यंत या चुकीचे स्क्रीनशॉट सर्वांनी काढून ठेवले होते. पाकिस्तानमध्ये राहणारे मुर्जता सोळंगी यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री शाह यांच्यावर गंभीर टीका केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी माफी न मागताच ट्विट डिलीट केल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला.
Sindh has the largest number of Hindu population in Pakistan with areas where Hindus are in overwhelming majority. One can only be sad at the state of affairs if the staff at the CM House Sindh doesn’t know the difference between Diwali and Holi. Sad indeed. pic.twitter.com/QdpDe6f3Pl
— Murtaza Solangi (@murtazasolangi) November 4, 2021
Sindh has the largest number of Hindu population in Pakistan with areas where Hindus are in overwhelming majority. One can only be sad at the state of affairs if the staff at the CM House Sindh doesn’t know the difference between Diwali and Holi. Sad indeed. pic.twitter.com/QdpDe6f3Pl
— Murtaza Solangi (@murtazasolangi) November 4, 2021
दरम्यान, सिंध येथील मुख्यमंत्री शाह यांना सोशल मीडियावर लक्ष्य केलं जातंय. काही नेटकरी हे स्क्रीनशॉट काढून शाह यांना ट्रोल करताना करताना दिसत आहेत.
इतर बातम्या :
मुकेश अंबानी भारताबाहेर कुठेही स्थलांतर करणार नाहीत, ते वृत्त चुकीचं, रिलायन्सचं स्पष्टीकरण
आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे, कोण आहेत संजय सिंग?