पाकिस्तानचं चांद्रयान बघून लोकं म्हणाले, ‘हे तर डायरेक्ट जन्नत मध्ये जाणार’
5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत, जे पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय. सध्या चांद्रयानाशी संबंधित एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक खूप हसत आहेत.
इस्लामाबाद: शुक्रवारी भारताने नवा इतिहास रचला. इस्रोने चांद्रयान-3 लाँच केले, जे यशस्वी झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आले. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत, जे पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय. सध्या चांद्रयानाशी संबंधित एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक खूप हसत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Atheist_Krishna नावाच्या आयडीसह हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चंद्रावर पोहोचण्यासाठी इस्रो चांद्रयान-3 वर 615 कोटींपेक्षा जास्त खर्च करत आहे, तर पाकिस्तान 15 रुपयांपेक्षा कमी खर्च करत आहे’.
पाकिस्तानी लोक रॉकेटसारखा फुगा जाळून तो आकाशात सोडताना दिसत आहेत. मजेशीर पद्धतीने लोक याला पाकिस्तानचे ‘चांद्रयान’ म्हणत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन लोक छतावर उभे आहेत आणि काही लोक खाली उभे आहेत आणि रॉकेटसारख्या मोठ्या फुग्याच्या आत आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. फुग्याला आग लागताच फुगा हवेत उडून जातो आणि उडताना दूर जातो. हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानींचे हे मजेशीर रॉकेट पाहून लोक हसले आहेत.
#ISRO spending over Rs 615 crore on #Chandrayan3 to reach the moon, whereas Pakistan spending less than Rs 15.
ISRO = 0 SUPARCO = 1 pic.twitter.com/uFkWvn0Tdi
— Krishna (@Atheist_Krishna) July 14, 2023
अवघ्या 35 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाख 20 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.