न्यूजरूम मधील सर्वजण पळाले, अँकर तिथेच! भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
या व्हिडिओमध्ये अँकर बातम्या वाचत असताना जोरदार भूकंप होतो आणि संपूर्ण न्यूजरूम भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरायला लागते. आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या जोरदार धक्क्यानंतरही अँकर जीवाची पर्वा न करता बातम्या वाचत राहतो.
पाकिस्तानात गेल्या मंगळवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यानंतरही एका वृत्तवाहिनीच्या अँकरने ब्रेकिंग सुरूच ठेवले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हायरल क्लिपमध्ये असे दिसत आहे की, भूकंपाच्या धक्क्यांमुळे स्टुडिओ जोरात हलायला लागतो. पण याची पर्वा न करता न्यूज अँकर चॅनेलच्या प्रेक्षकांना भूकंपाची माहिती देत असतो. पाकिस्तानात झालेल्या भूकंपात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये अँकर बातम्या वाचत असताना जोरदार भूकंप होतो आणि संपूर्ण न्यूजरूम भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरायला लागते. आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या जोरदार धक्क्यानंतरही अँकर जीवाची पर्वा न करता बातम्या वाचत राहतो. काही सेकंदानंतर न्यूजरूममध्ये उपस्थित असलेले बाकीचे लोक आपला जीव वाचवण्यासाठी धावतात हे आपण पाहू शकता. भूकंपानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अँकरच्या शौर्याचं लोक भरभरून कौतुक करत आहेत.
31 सेकंदाचा हा व्हिडिओ पाकिस्तानच्या पेशावरमधील महश्रीक टीव्ही या स्थानिक टीव्ही चॅनेलचा आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ट्विटरवर इनाम अजल आफ्रिदी नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर करत अँकरचे कौतुक केले आहे. युजरने लिहिले की, भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यानंतरही अँकरने आपला लाइव्ह कार्यक्रम सुरू ठेवला.
Pashto TV channel Mahshriq TV during the earthquake. Bravo anchor continued his live program in the ongoing earthquake.
#earthquake #Peshawar pic.twitter.com/WC84PAdfZ6
— Inam Azal Afridi (@Azalafridi10) March 21, 2023
मंगळवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबादपासून 133 किमी आग्नेयेला होता, तर त्याचे केंद्र जमिनीपासून 56 किमी खोलीवर होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 133.56 इतकी नोंदवण्यात आली. त्याचा परिणाम भारत, पाकिस्तानसह 6 देशांमध्ये दिसून आला.