Video: एक बाईक, 6 प्रवासी आणि भन्नाट जुगाड, पाकिस्तानची दुचाकी टॅक्सी पाहिली का?

सध्या पाकिस्तानी जुगाडाचा एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जुगाडाच्या बाबतीत भारत आणि पाकिस्तान तसे वेगळे नाही. पण पाकिस्तानचा हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की तो पाहिल्यानंतरही तुमचं हसणं थांबणार नाही.

Video: एक बाईक, 6 प्रवासी आणि भन्नाट जुगाड, पाकिस्तानची दुचाकी टॅक्सी पाहिली का?
जुगाड करुन बनवलेली पाकिस्तानची बाईक टॅक्सी
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 3:09 PM

भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी असले तरी दोघांमधील वैर कुणापासून लपलेलं नाही. हेच कारण आहे की पाकिस्तानमध्ये जे काही घडतं, ते भारतात चर्चेचा विषय बनतं. भारतीय त्याचा खूप आनंद घेते. सध्या पाकिस्तानी जुगाडाचा एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जुगाडाच्या बाबतीत भारत आणि पाकिस्तान तसे वेगळे नाही. पण पाकिस्तानचा हा व्हिडीओ इतका मजेदार आहे की तो पाहिल्यानंतरही तुमचं हसणं थांबणार नाही. (Pakistani bike jugaad video goes viral on social media)

या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी जुगाड कलेत किती निपुण झाले आहेत स्पष्टपणे दिसते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं एका बाईकचं ‘टॅक्सी’ मध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. ज्यावर तब्बल सहा लोक आरामात बसले आहेत. दुचाकी मागे शिडीला जोडली आहे आणि शिडीच्या मागे दोन टायर बसवण्यात आले आहेत. एकूण सहा लोक या गाडीवर आहेत. जेव्हा ही ‘टॅक्सी’ रस्त्यावर आली तेव्हा सगळे बघत राहिले.

व्हिडीओ पाहा-

या दरम्यान, कोणीतरी या जुगाडचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेचा विषय बनला. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक आवाजही ऐकू येतो. ज्यात नवीन लाँच झालेल्या कारची वैशिष्ट्यै सांगितली जात आहे, आणि त्याची तुलना या बाईक टॅक्सीशी केली जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोक पोट धरुन हसले. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, जुगाडाच्या बाबतीत पाकिस्तानशी तुलना होऊ शकत नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तेव्हापासून तो प्रचंड शेअर होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून हसत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर ‘SJSvasan’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही पाहा:

Video: गुजरातमध्ये नवरात्रीत कोरोनाला हरवणारा गरबा, पीपीई कीट घालून केलेल्या गरब्याचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video: उंचच उंच इमारतीला आग लागली, विझवणार कशी? नो टेन्शन, ड्रोन आहे ना? पहा व्हिडीओ

 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.