‘राम लीला’ मधील गाण्यावर पाकिस्तानी मुलीचा तगडा डान्स, स्टाईल बघून लोक विसरले आयशाला
तिच्या डान्स मूव्ह्स आणि एक्सप्रेशन्स पाहून इंटरनेटवरील लोक तिच्या स्टाईलवर फिदा झालेत. जर तुम्ही हा व्हिडिओ अद्याप पाहिला नसेल तर तुम्ही तो खाली पाहू शकता.
पाकिस्तानी मुलगी आयशा आठवतेय? जिच्या डान्स व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. होय, तिने ‘मेरा दिल ये पुकारे आजा…’ या गाण्यावर डान्स केला होता. या व्हिडीओने बराच काळ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. इतका जबरदस्त डान्स केला की इन्स्टाग्रामच्या दुनियेत अनेक दिवस या गाण्यावर रील्स बनल्या. आता आणखी एका पाकिस्तानी मुलीने इंटरनेटवर असाच धुमाकूळ घातलाय. जेव्हा ती तिच्या बहिणीच्या लग्नात संगीत कार्यक्रमात सहभागी झाली होती तेव्हा रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटातील हिट गाणे ‘अंग लगा दे रे…’ वर तिने परफॉर्मन्स दिला. तिच्या डान्स मूव्ह्स आणि एक्सप्रेशन्स पाहून इंटरनेटवरील लोक तिच्या स्टाईलवर फिदा झालेत. जर तुम्ही हा व्हिडिओ अद्याप पाहिला नसेल तर तुम्ही तो खाली पाहू शकता.
हा शानदार डान्स व्हिडिओ 15 जानेवारी रोजी @natalia.calling या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता. यात कॅप्शनमध्ये लिहिले की, “इन्स्टाग्राम मला सगळं अपलोड करू देणार नाही. पण ही माझी प्रतिभावान लहान बहीण आहे, ज्याचा मला खूप अभिमान आहे! हा क्षण मला तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचा आहे.”
View this post on Instagram
आतापर्यंत या व्हिडिओला 22 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 2 लाख 23 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स मुलीच्या डान्स स्टेप्सचे चाहते झाले, तर कुणाच्या हावभावांनी तिची मने जिंकली.