Video | भर रस्त्यात बायकोला दिलं गुलाबाचं फुल, लाजून महिलेने दिलं मजेदार उत्तर, व्हिडीओ व्हायरल
विशेष म्हणजे आपल्या पत्नीसोबत रोम्नस करण्याच्या मूडमध्ये तो आहे. त्याने जवळ एक गुलाबाचे फुल ठेवले आहे. हे फुल हातात घेऊन त्याने आपली पत्नी दुआ सिद्दीकीला जवळ बोलावले आहे.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. या माध्यामाला देशाच्या सीमा नाहीत. एका क्षणात आपण कोणत्या देशात काय सुरु आहे हे जाणून घेऊ शकतो. कदाचित याच कारणामुळे सध्या पाकिस्तानचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील एका माणसाने बायकोबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आगळीवेगळी ट्रिक वापरली आहे. हा व्हिडीओ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
नवऱ्याने त्याच्या पत्नीला आवाज दिला
व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी माणूस बोलत असल्याचे दिसतेय. त्याचे नाव बिलाल खान (Bilal Khan) आहे. तो कारमध्ये बसला आहे. कारमध्ये बसून त्याने आपल्या पत्नीला आवाज दिलाय. विशेष म्हणजे आपल्या पत्नीसोबत रोमान्स करुन प्रेम व्यक्त करण्याच्या मूडमध्ये तो आहे. त्याने जवळ एक गुलाबाचे फुल ठेवले आहे. हे फुल हातात घेऊन त्याने आपली पत्नी दुआ सिद्दीकीला जवळ बोलावले आहे.
गुलाबाचे फुल पाहताच महिला खुलली
आपल्या पतीने आवाज देताच माणसाची पत्नी दुआ सिद्दीकी दरवाजा उघडून बाहेर आली आहे. तसेच ती कारजवळ येताच माणसाने तिच्यासमोर गुलाबाचे फुल धरले आहे. आपल्या नवऱ्याचा हा अवतार पाहताच व्हिडीओतील महिला चांगलीच खुलली आहे. तिने हसत हसत आपल्या पतीजवळचे फुल घेतले आहे. तसेच लाडात येऊन तिने आपल्या नवऱ्याोसबत मस्करी केली आहे. महिलेने गुलाबाचे फुल घेतले आहे. तसेच मी किचनमध्ये स्वयंपाक करत आहे आणि यांचं प्रेम संपत नाहीये, असे ही महिला म्हणाली आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बिलाल खान कंटेन्ट क्रिएटर आहेत. त्यांनी हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नववरीचे हावभाव पाहून नेटकरी आनंदी झाले आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय़ ठरला आहे. काही लोक या व्हिडीओला आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअरसुद्धा करत आहेत. सध्या हा व्हिडीओ bilalkhan228 या अकाऊंटवर पाहता येईल.
इतर बातम्या :
Video: “एक झाड नाही पाडलं, शेकडो पक्ष्यांचं घर उद्ध्वस्त केलं”, नेटकरी व्हिडीओ पाहून संतापले!
Video: टीव्ही पाहणाऱ्या कुत्र्यासोबत मालकाने असा प्रँक केला, की नेटकरी पोटधरुन हसले!
अरे देवा! डेन्टिस्टची फी परवडली नाही म्हणून महिलेने स्वत:च 11 दात उपटले; नंतर काय हाल झाले पाहा!
(pakistani man giving rose to his wife romantic and funny video went viral on social media)