बिबट्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर इम्रान खान ट्रोल, लोक म्हणतात – पंतप्रधान बनण्यापेक्षा ब्लॉगिंग सुरु करा!
या व्हिडीओनंतर पाकिस्तानमधील लोक इम्रान खान यांचं जोरदार ट्रोलिंग करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान हे या व्हिडीओच्या माध्यमातून काही वेगळं सांगत होते पण त्यांनी हातून आपली फजिती करुन घेतल्याचं दिसत आहे. अशावेळी एका यूजरने तर 'भैय्या, तुम्ही पंतप्रधान होण्यापेक्षा ब्लॉगिंग सुरु करा', असा सल्लाच देऊन टाकलाय.
नवी दिल्ली : पाकिस्तामध्ये (Pakistan) सध्या महागाईनं (Inflation) आकाश गाठलं आहे. पाकिस्तानमधील नागरिक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडीओ टाकण्यात धन्यता मानत आहेत. इम्रान खान यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर नुकताच बर्फाळ प्रदेशातील बिबट्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर पाकिस्तानमधील लोक इम्रान खान यांचं जोरदार ट्रोलिंग करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान हे या व्हिडीओच्या माध्यमातून काही वेगळं सांगत होते पण त्यांनी हातून आपली फजिती करुन घेतल्याचं दिसत आहे. अशावेळी एका यूजरने तर ‘भैय्या, तुम्ही पंतप्रधान होण्यापेक्षा ब्लॉगिंग सुरु करा’, असा सल्लाच देऊन टाकलाय.
आपण थोडं मागे जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, इम्रान खान काहीही करतात तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांना ट्रोल केलं जातं. 25 डिसेंबर रोजी त्यांनी ट्वीटर अकाऊंटवर एका बर्फाळ प्रदेशातील बिबट्याचा व्हिडीओ शेअर केला आणि तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. इम्रान खान यांनी बिबट्याचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘गिलगित-बाल्टिस्तानच्या खापलू परिसरात लाजणाऱ्या बिबट्याचं दुर्लभ फुटेज’. मात्र, ट्वीटरवर व्हिडीओ व्हायरल होताच पाकिस्तानमधीलच नागरिकांनी पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. काहींनी त्यांना आपल्या देशातील प्रश्नांवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची सोडून ब्लॉगिंग सुरु करण्याचा सल्ला दिला आहे.
Rare footage of the shy snow leopard in Khaplu, GB pic.twitter.com/M8OZEwKs1C
— Imran Khan (@ImranKhanPTI) December 25, 2021
थोडं देशावरही लक्ष द्या, यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
एका महिलेनं इम्रान खान यांच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिलं आहे की, ‘भैया तुम्ही एखादा vlog shlog चं सुरु करा पंतप्रधान होण्यापेक्षा’. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, ‘त्यालाही खाल आणि त्याची कातडी विकून टाकाल’. तसंच तिसऱ्या यूजरने थोडं देशावरही लक्ष द्या, असा सल्ला दिला आहे.
Bhaiya tum koi vlog shlog he khol letey PM bannay ke bajaye.
— – (@maulana_banana) December 25, 2021
पाकिस्तानातील जनता महागाईने त्रस्त
पाकिस्तानातील जनता महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त झाली आहे. या प्रश्नांची उकल न करता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी प्राण्यांचा व्हिडीओ पोस्ट करणं म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखं आहे. एका यूजरने संताप व्यक्त करत, ‘पंजाबचे मंत्री हमाद अजहर (Minister Hamad Azhar) यांनी अनेक महिन्यांपासून इंधन एडजस्टमेंटच्या नावाने लूट चालवली आहे. मला नाही वाटत की यावेळी पीटीआयला कोणी मत देईल. जरा लक्षात ठेवा इम्रान साहेब’, असं म्हटलं आहे.
नवाझ शरीफ यांच्या फोटोचेही मीम्स
अनेक पाकिस्तानी ट्विटर यूजरने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या फोटोचे मीम्सही शेअर केले आहेत. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये नवाझ शरीफ यांचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, लाजाळू म्हशीचे दुर्लभ चित्र. दरम्यान, इम्रान खान यांच्या या पोस्टला आतापर्यंत 33 हजारापेक्षा अधिक लोकांना लाई केलं आहे. तर 5 हजार 600 पेक्षा अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे.
Rare footage of shy panda https://t.co/yIa9bGFrjg
— J. Sad Latte (@naanchannay) December 25, 2021
इतर बातम्या :