Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Wari 2022: चला माऊली, वारीतले काही व्हायरल दृश्य बघू… या! तुम्हालाही वारीतच असल्यासारखं वाटेल

Pandharpur Wari 2022: आपल्या भक्तीचा सोहळा साजरा करतायत. बघुयात असेच वारीतले काही व्हायरल क्षण, व्हायरल झालेले वारकरी...! 

Pandharpur Wari 2022: चला माऊली, वारीतले काही व्हायरल दृश्य बघू... या! तुम्हालाही वारीतच असल्यासारखं वाटेल
Pandharpur Wari 2022Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 3:18 PM

Pandharpur Wari 2022: तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पंढरपूरमध्ये (Pandharpur wari 2022) एकादशीचा मोहत्त्सव साजरा होणार आहे. यंदाच्या वारीत विक्रमी वारकरी सामील झाल्याने भाविकांची गैरससोय टाळण्यासाठी 24 तास दर्शन (24 hours darshan) व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. कालपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजेनंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आला. चोवीस तास दर्शनाला उभे राहून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. विठूराच्या भेटीला आसुसलेले वारकरी सुद्धा मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेनं चालतायत. आपल्या भक्तीचा सोहळा साजरा करतायत. बघुयात असेच वारीतले काही व्हायरल (Pandharpur Wari Viral 2022) क्षण, व्हायरल झालेले वारकरी…!

तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालंना, एकट्या विठुरायाला गं संसारं पेलंना

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Venkatesh ware ? (@ekadanta_photography)

तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागली

View this post on Instagram

A post shared by R O H I T ? (@rohitpitke_18)

माऊली माऊली, माऊली माऊली,माऊली माऊली, रूप तुझे !

चालला गजर, जाहलो अधिर,लागली नजर कळसाला पंचप्राण हे तल्लीन, आता पाहीन पांडुरंगाला!

View this post on Instagram

A post shared by Sumit (@oyesumitt)

पुंडलिक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय

(बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. हे फोटोज व्हिडिओज वेगवेगळ्या फोटोग्राफर्स काढलेले आहेत. आवडले तर त्यांना फॉलो करा.)