Shardiya Navratri 2023 | पाणीपुरी मध्ये बसवलेली देवी इंटरनेटवर व्हायरल! व्हिडीओ बघा

गणपतीच्या काळात वेगवगेळ्या मंडळांमध्ये वेगवेगळ्या थीम्सने गणपती बसवले जातात. आपणसुद्धा सगळ्या मंडळांचे गणपती यासाठी बघायला जातो कारण प्रत्येक मंडळ, त्याची थीम, त्यांचा गणपती वेगळा असतो. गणेशोत्सवा सारखाच साजरा केला जातो नवरात्रीचा उत्सव. हा उत्सव खरा बघण्यासारखा असतो तो कोलकातामध्ये. चला तर मग बघुयात कोलकात्यामधील व्हायरल झालेला व्हिडीओ...

Shardiya Navratri 2023 | पाणीपुरी मध्ये बसवलेली देवी इंटरनेटवर व्हायरल! व्हिडीओ बघा
golgappa devi kolkata viral video
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 12:41 PM

कोलकाता: कोलकाता मध्ये नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो. आपल्याकडे महाराष्ट्रात जसा गणपती बसवला जातो, त्याची जितकी धामधूम असते तितकीच धामधूम कोलकाता मध्ये दुर्गा पूजेची धामधूम असते. आपल्याकडे गणपतीत वेगवेगळी मंडळे असतात, त्या मंडळांमध्ये गणपती बसवताना वेगवेगळ्या थीम्सचा वापर केला जातो. एक थीम ठरवली जाते आणि तशा पद्धतीने गणपतीची सजावट केली जाते, हो ना? अगदी असंच कोलकाता मध्ये केलं जातं. आपल्याकडे ज्याला आपण मंडळ म्हणतो तिकडे त्याला पंडाल म्हटलं जातं. या पंडालमध्ये खूप सदस्य असतात. हे सदस्य मिळून ठरवतात की आपल्या पंडालची थीम काय ठेवायची. जी थीम ठरेल त्यानुसार मग सगळी ती सजावट. गणपतीत आपल्याकडे अशी चांद्रयानची थीम खूप ठिकाणी पाहण्यात आली होती. असाच एक कोलकाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक देवी चक्क गोलगप्प्यात बसवलीये. होय! गोलगप्पा, पाणीपुरी, पुचका…बंगाली लोकांच्या भाषेत पुचका थीम मध्ये ही देवी बसवण्यात आलीये.

पाणीपुरीची थीम? मग देवी कुठे बसवली?

आजवर आपण महाराष्ट्रात गणपतीच्या काळात अनेक प्रकारच्या सजावटी पाहिल्या, सगळ्या थीम्स पाहिल्या. आता तर नवरात्रोत्सवात कोलकातामधील अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतायत. एक-एक थीम हटके आहे. कधी-कधी तर आपल्याला प्रश्न पडतो की लोकांमध्ये इतकी क्रिएटिव्हिटी येते कुठून. हा व्हिडीओ जो व्हायरल होतोय त्यात चक्क पाणीपुरीची थीम आहे. पाणीपुरीची थीम? मग देवी कुठे बसवली? अर्थात पाणीपुरीमध्येच बसवली.

बघा व्हिडीओ…

मंडळाचं मंडप पाणीपुरीने भरलेलं

या व्हिडीओच्या सुरुवातीपासूनच आपल्याला पाणीपुरी दिसायला लागते. मंडळाचं मंडप पाणीपुरीने भरलेलं आहे. मंडपच एक एक पुचका लावून सजवण्यात आलाय. जसा जसा व्हिडीओ पुढे जातो, देवीजवळ जाऊन लक्षात येतं की देवी एका फुटलेल्या पाणीपुरीमध्ये बसवलेली आहे. ज्या लोकांना पाणीपुरी प्रचंड आवडते त्या लोकांना या पंडालची ही थीम बघून खूप छान वाटेल. आपण तर पाणीपुरीत देवी बसवण्याचा स्वप्नात देखील विचार करू शकत नाही, हो ना?

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.