रेलिंग मध्ये हिचं डोकं अडकलं, व्हिडीओ बघून नेटकरी उडवतायत खिल्ली
आता अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये एक मुलगी अशा 'विचित्र' ठिकाणी अडकते की नेटिझन्स म्हणतात - "लो भैया, ये है पापा की परी का नया कारनामा".
मुंबई: इंटरनेटवर एखादी गोष्ट कधी व्हायरल होते याचा अंदाज बांधणे कठीण असते. यातील काही व्हिडिओ धक्कादायक आहेत, तर काही लोकांना हा व्हिडीओ बघून आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. आता अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये एक मुलगी अशा ‘विचित्र’ ठिकाणी अडकते की नेटिझन्स म्हणतात – “लो भैया, ये है पापा की परी का नया कारनामा”.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्यावरील रेलिंगच्या आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण दुसऱ्याच क्षणी तिचं डोकं ग्रिलमध्ये अडकून पडतं. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी शक्य तितके प्रयत्न करते, परंतु डोके बाहेर काढू शकत नाही. यावेळी एका व्यक्तीने तिचा व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला, जो आता व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
एका इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलेला हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. काही तासांपूर्वी अपलोड करण्यात आलेल्या या क्लिपला आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये लोक मुलीला प्रचंड चिडवत आहेत. “वो स्त्री है कुछ भी कर सकती है” असं काही लोक म्हणतायत तर काहीजण तिला, “पापा की परी का नया कारनामा” असं देखील म्हणतात.