Video : नर्सचा जबरदस्त डान्स बघून लकवा भरलेला पेशंटही लागला नाचू, व्हिडिओ तुफान व्हायरल
हा हृदयस्पर्शी व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'नर्सने हुशारीने डान्स केला आणि अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला उत्साह आणि उत्साहाने फिजिओथेरपी व्यायाम करून दिला'.
मुंबई : रुग्णालयातील वातावरण चांगल्या व्यक्तीलाही (Hospital) आजारी बनवते. सर्वत्र रुग्ण पाहून निरोगी लोकही डिप्रेशनमध्ये (Depression) जातात, त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांची काय अवस्था असेल, याची कल्पनाही करता येणार नाही. मात्र, जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर आजारी असते तेव्हाच रुग्णालयात दाखल होते आणि अशा परिस्थितीत रुग्णालयातील वातावरण योग्य नसेल तर लोक आणखी आजारी पडतात. विशेषत: सरकारी रुग्णालयांची स्थिती तुम्हाला माहीत असेलच. त्यामुळे लोक खासगी रुग्णालयातच जाणे पसंत करतात. मात्र, रुग्णालयांमध्ये उपचारासोबतच डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले, तर रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढते. हॉस्पिटल आणि नर्सशी (Nurse Dance) संबंधित एक अतिशय सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचे मन आनंदित होईल.
या व्हिडिओमध्ये एक परिचारिका बेडवर पडलेल्या अर्धांगवायूच्या रुग्णाला डोलायला लावते आणि रुग्ण आपले सर्व दु:ख विसरून त्यात मग्न होतो. बॅकगाऊंडला एक गाणे वाजत असून नर्स भन्नाट स्टाईलमध्ये नाचत असून पेशंटचा हुरूप वाढवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या दरम्यान, रुग्ण देखील खूप आनंदी दिसत आहे आणि आणि तोही गाण्याच्या तालावर नर्ससोबत डोलतोय. रुग्णालयातील वातावरण असे असल्यास कसलाही रुग्ण लवकरच ठणठणीत होईल.
नर्स ने बड़ी चतुराई से डांस करते हुए लकवाग्रस्त मरीज़ में उमंग और उत्साह भरकर फिजियोथेरेपी एक्सरसाइज करवा दी.
मरीज़ जब ठीक हो जाते हैं, तो सभी डॉक्टर्स को धन्यवाद देते हैं. लेकिन नर्सेस और अन्य मेडिकल स्टाफ अपने प्रेम से जो इलाज करते हैं, उसके लिए ‘धन्यवाद’ बेहद छोटा शब्द है… pic.twitter.com/dLvXZVgfgh
— Dipanshu Kabra (@ipskabra) January 24, 2022
हा हृदयस्पर्शी व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नर्सने हुशारीने डान्स केला आणि अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला उत्साह आणि उत्साहाने फिजिओथेरपी व्यायाम करून दिला. रुग्ण बरे झाल्यावर सर्व डॉक्टरांचे आभार मानतात. पण नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचार्यांच्या प्रेमळ उपचारांसाठीही त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. 1 मिनिट 29 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 23 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 21 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.