पोपटाची विद्यार्थ्यांसोबत मैत्री, जवळ जाताच अंगाखांद्यावर खेळतो, अनोख्या दोस्तीची सोशल मीडियावर चर्चा
मध्य प्रदेशमधील एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका पोपटाला शाळेतील विद्यार्थ्यांचा लळा लागलाय. हा पोपट विद्यार्थ्यांना भेटतो. तसेच त्यांच्यासोबत खेळतोसुद्धा.
ग्वालियर : पक्षी आणि माणसाचं एक वेगळंच नातं आहे. पक्ष्यांना लळा लावला तर तेही माणसांवर प्रेम करायला लागतात. याची अनेक उदाहरण आपण यापूर्वी पाहिली असतील. याचीच प्रचिती देणारा मध्य प्रदेशमधील एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका पोपटाला शाळेतील विद्यार्थ्यांचा लळा लागलाय. हा पोपट विद्यार्थ्यांना भेटतो. तसेच त्यांच्यासोबत खेळतोसुद्धा.
पोपटाची विद्यार्थ्यांसोबत अनोखी मैत्री
मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार मध्य प्रदेशमधील ग्वालियर जिल्ह्यातील शारदा बालग्राम जंगल परिसरातील आहे. या भागात एक पोपट आहे. हा पोपट रस्त्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ जातो. तसेच त्यांच्यासोबत खेळतो. विशेष म्हणजे तो विद्यार्थ्यांना अजिबात घाबरत नाही. या पोपटाने विद्यार्थ्यांसोबत अनोखी मैत्री केली आहे.
विद्यार्थी म्हणतात पोपट आमच्यासोबत खेळतो
या मैत्रीविषयी विद्यार्थ्यांनी अधिक माहिती दिली आहे. हा पोपट रोजच आमच्याकडे येतो. आम्ही जेव्हा शाळेत जातो तेव्हा तो आमच्या खांद्यावर येऊन बसतो. कधीकधी तर तो आमच्या डोक्यावरही बसतो. हा पोपट आमच्यासोबत खेळतो. तसेच तो आम्हाला घाबरतदेखील नाही. आम्ही खूप मस्ती करतो, असे पोपटासोबत गट्टी जमलेले विद्यार्थी सांगतात.
Madhya Pradesh | A parrot of Gwalior’s Sharda Balgram forest has developed a unique friendship with children of a nearby school.
“He comes every day when we leave for our school and sits on our shoulder or head, playing with us all the way” says one of the students, Vivek pic.twitter.com/8AloyU84lC
— ANI (@ANI) October 1, 2021
अनोखी मैत्री सोशल मीडियावर ठरली चर्चेचा विषय
या अनोख्या मैत्रीचे फोटो एएनआयने ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पोपट विद्यार्थ्यांच्या डोक्यावर बसल्याचे दिसत आहे. तसेच खांद्यावर बसूनसुद्धा पोपट विद्यार्थ्यांसोबत मस्ती करतोय. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून त्यांना मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी तर मजेदार कॅप्शनदेखील दिले आहेत.
इतर बातम्या :
रात्रीच्या अंधारात हे काय घडलं ! सापाने सशाची चक्क 16 पिल्लं गिळली, सर्पमित्रही अवाक्
जेसीबीच्या फाळक्यात बसून नव दाम्पत्याची वरात, पाकिस्तानच्या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल
Video: वयाच्या पंच्याहत्तरीतही काम करण्याचा उत्साह, नागपुरातल्या फाफडेवाल्या आजींनी इंटरनेटवर चर्चा
Bigg Boss 15 premiere Live Updates : नवा ड्रामा, नवा धमाका, नवे चेहरे, ‘बिग बॉस’चा 15वा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला!#BiggBoss15 | #BiggBoss15House | #SalmanKhan https://t.co/rAVZpzosGs
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 2, 2021