“अरे दिल धड़का वे सिटी बजावे”, एक पोपट जेव्हा फ्लर्ट करतो!
गंमत म्हणजे पोपट स्वभावात अगदी रोमँटिक दिसतो. कारण तो कुत्र्याकडे पाहून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतोय.
पोपट कसा असतो हे आपल्या सर्वांनाच लहानपणापासून माहीत आहे. तुमच्यापैकी अनेक जणांकडे पोपट असेल सुद्धा. पण पोपटाला फ्लर्ट करताना कधी पाहिलंय का? जर तुम्ही ते पाहिले नसेल, तर बघा. आजकाल पोपटाच्या अशाच एका व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतलंय, ज्यात पोपट कुत्र्याला पाहून शिट्टी वाजवून गायला सुरुवात करतो. शिट्टी ऐकून कुत्रा ज्या प्रकारे भाव खातो, ते पाहण्यासारखे आहे. हा व्हिडिओ तुमचा दिवस चांगला बनवेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेक्सिकन डॉग ब्रीड चिहुआहुआ सोफ्यावर बसलाय. तिथे एक पांढरा पाळीव पोपटही आहे.
गंमत म्हणजे पोपट स्वभावात अगदी रोमँटिक दिसतो. कारण तो कुत्र्याकडे पाहून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. पण चिहुआहुआ त्याला भावही देत नाहीये. व्हायरल क्लिपमध्ये पोपट कुत्र्याभोवती फिरत शिट्टी वाजवून जिंगल बेल गाताना दिसत आहे.
या काळात चिहुआहुआ जशा प्रकारे भाव खातो ते बघण्यासारखं आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आम्हाला खात्री आहे की, तुम्हीही त्याचा खूप आनंद घ्याल.
हा अतिशय गोंडस व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Yoda4ever नावाच्या हँडलसह शेअर करण्यात आला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पक्ष्याला गायला आवडते, पण कुत्रा…”
Bird loves singing, but dog…?? ????
Sound on..??pic.twitter.com/f5Xd1tNXF5
— ?o̴g̴ (@Yoda4ever) December 13, 2022
एक दिवसापूर्वी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 3 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 15 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. याशिवाय अनेकांनी व्हिडिओवर त्यांचं प्रेम लुटलं आहे.
एका युझरने कमेंट केली की, “पोपट कुत्र्याला इम्प्रेस करू शकलेला नाही असं दिसतंय. त्याचबरोबर आणखी एका युझरने लिहिले आहे, अरे भैय्या… कुत्र्याचे हावभाव बघा.